esakal | दिलासादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये एवढ्या जणांची कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

दिलासादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये एवढ्या जणांची कोरोनावर मात

- पिंपरी-चिंचवडमधील दोन मुलींसह 15 जणांची कोरोनावर मात

- आजपर्यंत 76 जण कोरोनामुक्त

दिलासादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये एवढ्या जणांची कोरोनावर मात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला परिसर म्हणजे निगडी- तळवडेतील रुपीनगर. मात्र, या भागासाठी शुक्रवारी (ता. 8) एक दिलासादायक घटना घडली. ती म्हणजे रुपीनगरमधील तीन वर्षाच्या दोन मुलींसह सहा पुरुष आणि भोसरी, मोशीतील सात जण अशा 15 जणांचे चौदा दिवसांच्या उपचारानंतरचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे आजपर्यंत उपचार घेऊन घरी गेलेल्यांची संख्या 76 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निगडी-रुपीनगर परिसर म्हणजे शहराच्या उत्तरेकडील भाग. येथील 26 वर्षाच्या तरुणाला संसर्ग झाल्याचे 23 एप्रिल रोजी स्पष्ट झाले होते. त्याच्या हायरिस्क कॉन्टक्टमधील नागरिकांचीही तपासणी करण्यात आली आणि आठ दिवसांत येथील रुग्णांचा आकडा 30 वर पोहचला आणि रुपीनगर हॉटस्पॉट ठरला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सांगवीतील मुलीला संसर्ग

सांगवी भागातील 16 वर्षांची युवती, पुण्यातील ताडीवाला रोड येथील सहा वर्षांचा, चिखली ताम्हाणे वस्ती व मोशीतील दोघे, अशा पाच जणांना संसर्ग झाल्याचे आज आढळून आले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ताम्हाणे वस्ती सील

ताम्हाणे वस्ती- त्रिवेणीनगर- मोरया, विनायक मेडिकल- श्री महालक्ष्मी ट्रेडर्स- श्री स्वामी समर्थ स्क्रॅपसमोर- त्रिवेणीनगर रोड- श्रीराम फॅब्रिकेशन वर्कस्- हनुमान मेडिकल- म्हेत्रेवस्ती उद्यान- जलशुद्धीकरण केंद्र हा परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे.

loading image