बापरे, पिंपरी-चिंचवडमध्ये आज 'एवढ्या' जणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

शहरातील एक हजार 11 जणांना संसर्ग झाल्याचे आज आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 51 हजार 307 झाली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 12 जणांचा आज कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. यात 10 पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 879 झाली आहे. तसेच, शहरातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शहराबाहेरील तीन रुग्णांचाही आज बळी गेला. त्यामुळे शहरात आज 15 जणांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील एक हजार 11 जणांना संसर्ग झाल्याचे आज आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 51 हजार 307 झाली आहे. आज 809 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 38 हजार 196 जण बरे झाले आहेत. सध्या 12 हजार 232 रुग्ण सक्रीय आहेत. 

हे वाचा - पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त

आज मृत्यू झालेल्यांमध्ये काळेवाडी (पुरुष वय 48, पुरुष वय 62, स्त्री वय 87), भोसरी (पुरुष वय 63, पुरुष वय 55), आकुर्डी (पुरुष वय 57), वाल्हेकरवाडी (स्त्री वय 56), निगडी (पुरुष वय 71), दिघी (पुरुष वय 72), रहाटणी (पुरुष वय 82), रुपीनगर (पुरुष वय 42), चिखली (पुरुष वय 78), खेड (पुरुष वय 70), चाकण (पुरुष वय 45) आणि नाना पेठ पुणे (पुरुष वय 70) येथील नागरिकांचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराबाहेरील रुग्णसुद्धा शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. आजपर्यंत दोन हजार 20 रुग्ण शहरात उपचार घेऊन घरी गेले आहेत. मात्र, 194 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. शहराबाहेरील 38 व्यक्ती आज शहरातील रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झाल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 death in Pimpri-Chinchwad