पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police-Bandobast

गणेश विसर्जनानिमित्त मंगळवारी (ता. १) गर्दी करू नये म्हणून महापालिका आणि पोलिसांनी बंदोबस्त केला आहे. नदीपात्र, घाट आणि जेथे हौद आहेत, त्यासाठी ठिकाणी पोलिस बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी पुन्हा केले. या संदर्भात पोलिस आयुक्तांशी चर्चा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त

पुणे - गणेश विसर्जनानिमित्त मंगळवारी (ता. १) गर्दी करू नये म्हणून महापालिका आणि पोलिसांनी बंदोबस्त केला आहे. नदीपात्र, घाट आणि जेथे हौद आहेत, त्यासाठी ठिकाणी पोलिस बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी पुन्हा केले. या संदर्भात पोलिस आयुक्तांशी चर्चा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करतानाच विसर्जनासाठी महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार घरगुती गणपतीचे घरीच; तर सार्वजनिक मंडळांनी मंडपातच मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 

भामा आसखेड आंदोलनात सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा; मोठा संसर्ग होण्याची शक्यता

उत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात भाविकांनी रस्त्यावर गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. दीड दिवसासह पाचव्या आणि सातव्या दिवशी नदीपात्र, घाटांवरही काही जणांनी विसर्जन केल्याच्या तक्रारी आहे. यानिमित्ताने अनंत चतुर्दशीला अशा घटना घडणार नाहीत आणि लोक रस्त्यावर येणार नाहीत, याचे नियोजन महापालिकेने केले आहे. नदीपात्र, घाट आणि हौद असलेल्या ठिकाणी लाकडी बांबू उभारून रस्ते बंद केले आहेत. ते काम पूर्ण झाले असून, 
या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांची नेमणूक राहणार आहे, असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले. 

समाजाच्या विघ्नहर्ता स्वरूपाचा अभूतपूर्व जागर; ‘सकाळ’चा उपक्रम

पुणेकरांनी संपूर्ण उत्सव साधेपणाने आणि काळजी घेऊन साजरा केला आहे. मात्र, उत्सवातील सर्वांत महत्त्वाच्या टप्पा  म्हणजे विसर्जनाचा आहे. प्रत्येकाने सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी सहकार्य करावे. 
- मुरलीधर मोहोळ, महापौर

Edited By - Prashant Patil

Web Title: Municipal Police Prevent Crowd Devotees Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..