पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण पॉझिटिव्ह अडीच हजार, तर बरे झालेल्यांची संख्या दीड हजार

टीम ई सकाळ
शनिवार, 27 जून 2020

शुक्रवारी मध्यरात्री बारापासून शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंत संपलेल्या वीस तासांत पिंपरी चिंचवड शहरात 164 रुग्ण आढळले.

पिंपरी : शुक्रवारी मध्यरात्री बारापासून शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंत संपलेल्या वीस तासांत पिंपरी चिंचवड शहरात 164 रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या 2662 झाली आहे. आज 82 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 1053 जण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत एकूण 1566 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दोन जणांचा मृत्यू झाला. यात गांधीनगर पिंपरी येथील 52 वर्षीय व पिंपळे सौदागर येथील 57 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. आजपर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

आज पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले रुग्ण वैदू वस्ती - पिंपळेगुरव, जैनमंदिर -दिघी रोड, आदर्शनगर -दिघी , नढेनगर, मोरेश्वर कॉलनी- थेरगाव, अजंठानगर, चिखली, वडमुखवाडी, बिजलीनगर नखातेनगर, थेरगाव, बोपखेल, रामनगर, वाकड, नवी सांगवी , धावडे वस्ती, चिंचवड , प्राधिकरण , पवार नगर -सांगवी, ताम्हाणेवस्ती -चिखली, मोरेवस्ती , इंदिरानगर - चिंचवड, साईबाबानगर -चिंचवड, चक्रपाणी वसाहत -भोसरी, दिघीरोड -भोसरी, बौद्धनगर, मोरवाडी, केशवनगर- चिंचवड, संत तुकारामनगर, सांगवी गावठाण, नेहरूनगर, विजयनगर- काळेवाडी, खंडोबामाळ-भोसरी, कैलासनगर - थेरगाव, डी मार्ट पिंपरी, पिंपरीगाव , चिखली,  मोशी , काळभोरनगर,  सिद्धार्थनगर - दापोडी, मोहननगर , भाटनगर, एम्पायर इस्टेट , यमुनानगर, इंदिरानगर , नाशिकफाटा ,  कुर्डूवाडी, सदाशिवपेठ , तळेगाव -चाकण रोड येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत झालेले रुग्ण पवारनगर- जुनी सांगवी (पुरुष, वय ६४), गवळीनगर- भोसरी (पुरुष, वय ५५) येथील रहिवासी आहेत.

आज कोरोना मुक्त झालेले रुग्ण रमाबाईनगर पिंपरी, प्रियदर्शनी नगर सांगवी, बेलठिकानगर थेरगाव, मोरवाडी, वैभवनगर पिंपरी, नानेकर चाळ पिंपरी, गुलाब नगर दापोडी, अंकुश चौक निगडी, तापकीर चौक काळेवाडी, पिंपळे सौदागर, ताम्हाणे वस्ती चिखली, सद्गुरू कॉलनी वाकड, बौद्धनगर पिंपरी, मिलिंदनगर पिंपरी, उद्यम नगर पिंपरी, शिवशक्ती नगर भोसरी, हिंद चौक पिंपळे निलख, विठ्ठल नगर नेहरूनगर पिंपरी, बापदेव नगर किवळे, यमुनानगर निगडी, रुपीनगर निगडी, संभाजीनगर चिंचवड, च-होली, चिखली, सुदर्शन नगर पिंपळे गुरव, चिंचवड, बालाजी नगर भोसरी, पवनानगर चिंचवड, लोहगाव, वडगाव मावळ, कोंढवा, येरवडा, कान्हे, नवी पेठ पुणे येथील रहिवासी आहेत.

हेही वाचा- Video : आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे प्रदर्शन होणार मोशीत

पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी व सोबत किमान एक तरी अतिरीक्त मास्क ठेवावा.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 164 patients were found in pimpri chinchwad city