‍पिंपरी-चिंचवड शहरात 167 नवीन रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 89 हजार 593 झाली आहे. सध्या दोन हजार दोन सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार व शहराबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. 

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 167 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 93 हजार 255 झाली आहे. आज 82 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 89 हजार 593 झाली आहे. सध्या दोन हजार दोन सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार व शहराबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. 

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 660 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 682 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील रुग्ण पुरुष पिंपळे गुरव (वय 78), सांगवी (वय 43), चिंचवड (वय 43) व महिला सांगवी (वय 80) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष उस्मानाबाद (वय 70), बालेवाडी (वय 45) येथील रहिवासी आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या महापालिका रुग्णालयांत 899 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 103 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोन मधील एक हजार 204 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात तीन हजार 919 जणांची तपासणी करण्यात आली. आज 401 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 72 हजार 507 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 167 New Covid 19 Cases Found In pimpri chinchwad