पिंपरी-चिंचवड : दुपारी १५७ असलेला रुग्णांचा आकडा सायंकाळी एवढा वाढला...

टीम ई सकाळ
सोमवार, 29 जून 2020

- एकूण रुग्णसंख्या 2911 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन हजार 911 झाली आहे. त्यात रविवारी मध्यरात्री बारापासून सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या 187 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत एक हजार 717 जण बरे होऊन घरी गेले आहेत. आज 81 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या एक हजार 149 जणांवर उपचार सुरू असून, आजपर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दोन जणांचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

 हेही वाचा-  Breaking : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोना

आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण आनंदभुवन सोसायटी-थेरगाव, त्रिवेणीनगर- तळवडे, पवारवस्ती- दापोडी, दळवीनगर -निगडी, गव्हाणेवस्ती- भोसरी, विठ्ठलनगर -नेहरुनगर, मोहननगर -चिंचवड, संभाजीनगर, विवेकनगर -आकुर्डी, काळभोरनगर- चिंचवड, विठ्ठल मंदिर-आकुर्डी, कलाटेनगर- वाकड, शेंडगेवस्ती -वाकड, गुलिस्तानगर -कासारवाडी, गुरुदेवनगर -आकुर्डी, दत्तवाडी- आकुर्डी, गणेशनगर- बोपखेल, घरकुल- चिखली, तापकीरनगर- काळेवाडी, गायकवाडवस्ती -मोशी, चिंचवड स्टेशन, बापुकाटे चाळ -दापोडी, वाकडकरवस्ती- वाकड, केमसेवस्ती -वाकड, बौध्दनगर- पिंपरी, नवनाथ मंदीर- बोपखेल, सदगुरुनगर -भोसरी, भाटनगर पिंपरी, इंदिरानगर चिंचवड, भाऊपाटील रोड -दापोडी, अल्हाटवस्ती -वाकड, साईप्रितमनगर -रहाटणी, रिव्हररोड -पिंपरी, मिलिंदनगर- पिंपरी, आदर्शनगर- पिंपरी, रमाबाईनगर -पिंपरी, सुभाषनगर- पिंपरी, कोकणेनगर -काळेवाडी, साईबाबानगर -चिंचवड, राजेवाडेनगर -काळेवाडी, कृष्णा ट्रेडर्स -काळेवाडी, आळंदीरोड- भोसरी, दळवीचाळ- काळेवाडी, समृध्दी हॉटेल- पिंपरी, तथागत हौसिंग सोसायटी -पिंपरी, वाघेरे चाळ -पिंपरी, पिंपरीगाव, शिवशक्ती हौसिंग सोसायटी- निगडी, चिंचवडेनगर, गुरुदेवनगर आकुर्डी, फुलेचौक- रहाटणी, दिघीरोड -भोसरी, गणेशनगर- थेरगाव, सुदर्शननगर -चिखली, लक्ष्मीनगर -रावेत, म्हातोबा मंदीर रोड -वाकड, राजीवगांधी वसाहत- नेहरुनगर, आळंदीरोड -चिखली, केसर ट्री टाऊन -मोशी, तानाजीनगर -चिंचवड, सेक्‍टर - प्राधिकरण, नखातेनगर -थेरगाव, लांडगेआळी -भोसरी, खडकीरोड- बोपोडी, अमरावती, सासवड, चाकण, देहुरोड, बीड, मुंबई, सुपे व खडकी बाजार येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत झालेले रुग्ण खंडोबा माळ भोसरी, (पुरुष, वय- 51 वर्ष) व लातूर (पुरुष वय 36 वर्षे) येथील रहिवासी आहेत. आजपर्यंत शहरातील 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शहराबाहेरील 30 जणांचा मृत्यू झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज साईबाबानगर चिंचवड, पाटीलनगर चिखली, किनारा हॉटेल दापोडी, तापकीरनगर काळेवाडी, जयभिमनगर दापोडी, आर्दशनगर काळेवाडी, घरकुल चिखली, बौध्दनगर पिंपरी, खंडोबामाळ भोसरी, बिजलीनगर, आनंदनगर चिंचवड, आदर्शनगर दिघी, लांडेवाडी भोसरी, चऱ्होली, केशवनगर चिंचवड, घुले चाळ बोपखेल, वैदुवस्ती पिंपळेगुरव, सिद्धार्थनगर दापोडी, महात्मा फुलेनगर भोसरी, हनुमाननगर चिखली, पंतनगर चिखली, भाटनगर, रेल्वेगेट कासारवाडी, चिंतामणी चौक चिंचवड, खान्देशनगर मोशी, ऍटलास कॉलनी नेहरुनगर, काटेपिंपळे रोड पिंपळे गुरव, मोरवाडी कोर्ट, रिव्हररोड पिंपरी, प्राधिकरण, आंबेडकरनगर पिंपरी, देहु आळंदीरोड चिखली, भोईआळी चिंचवड, दत्तनगर वाकड, पुर्णानगर चिंचवड, मिलंदनगर पिंपरी, कुंजीरवस्ती पिंपळे सौदागर, संभाजीनगर चिंचवड, चंद्रलोक सोसायटी यमुनानगर, अशोक टॉकीज पिंपरी, भारतमाता नगर दिघी, चक्रपाणी वसाहत भोसरी, हारमोनी सोसायटी पिंपळे गुरव, मोहननगर चिंचवड, कोंढवा, कोथरुड, बावधान खुर्द, तळेगाव व बोपोडी येथील रहिवासी असलेले रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 187 new corona positive in Pimpri-Chinchwad till evening