पिंपरी-चिंचवड शहरात २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric Charging

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना इलेक्ट्रीक वाहने चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका २० ठिकाणी खासगी एजन्सीद्वारे ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन होणार

पिंपरी - शहरातील नागरिकांना इलेक्ट्रीक वाहने चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका २० ठिकाणी खासगी एजन्सीद्वारे ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. त्याला प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. ‘स्वत: बांधा आणि संचलित करा’ या तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नसून महापालिकेकडून संबंधित एजन्सीला केवळ जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. इलेक्ट्रीक वाहनांचा अधिक वापर होण्यास प्रोत्साहन मिळावे याकरिता महापालिकेने पुढाकार घेतला असून प्रदूषणमुक्त शहरासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या माझी वसुंधरा धोरणांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रमास चालना मिळण्याकरिता विविध उपाययोजना राबविणे, तसेच नुतनीकरणक्षम ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्याकरिता नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या विविध कार्यक्रमांच्या आणि धोरणांच्या उपलब्धतेवर आधारित नविकरणीय ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे. त्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना इलेक्ट्रीक वाहने चार्जिंग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी महापालिकेमार्फत ईव्ही चार्जिंग स्टेशन सात वर्षे कालावधीकरिता २० ठिकाणी वाजवी दराने विविध एजन्सींकडून स्वत: बांधा आणि संचलित करा (बिल्ड ऑपरेट अँड ओन) मॉडेलवर इलेक्ट्रीक वाहने चार्जिंग सुविधा वाजवी दराने उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. ग्राहकांसाठीच्या कमाल मर्यादा दराप्रमाणे प्रति युनिट १७ रुपये अधिक सेवावस्तूकर अशी रक्कम ही एजन्सी चार्जिंग फी म्हणून ग्राहकांकडून वसूल करू शकते.

ही आहेत ठिकाणे...

पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात, पिंपरीतील सीट्रस हॉटेलजवळ, दुर्गादेवी टेकडी निगडी, वाहतूकनगरी, बर्ड व्हॅली संभाजीनगर, बजाज अॅटोजवळ, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल भोसरी, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम नेहरूनगर, मलनि:सारण केंद्र चिखली, राधास्वामी रोड चिखली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव कासारवाडी, निसर्ग निर्माण सोसायटी रिलायन्स मार्टजवळ कोकणे चौक पिंपळे सौदागर, विंटेज सोसायटी पिंपळे सौदागर, योगा पार्क विबग्योर शाळा पिंपळे सौदागर, राजमाता जिजामाता उद्यान पिंपळे गुरव, वंडर कार्स निसर्ग निर्माण सोसायटी कोकणे चौक पिंपळे सौदागर, भक्ती-शक्ती बस टर्मिनल निगडी, एच. ए. कंपनी सब वेजवळ, सीएमई सीमाभिंतीलगत फुगेवाडी आणि संत तुकाराम मेट्रो स्टेशनच्या चौथ्या प्रवेशद्वाराजवळ.

Web Title: 20 Places Charging Station In Pimpri Chinchwad City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..