Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 21 जणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज 624 रुग्ण आढळले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 624 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 79 हजार 338 झाली आहे. आज 1040 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 72 हजार 164 झाली आहे. सध्या साडेपाच हजार सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील 14 आणि शहराबाहेरील सात अशा 21 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 337 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 500 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष कुदळवाडी (वय 45), तळवडे (वय 83), मिलिंदनगर (वय 63), आकुर्डी (वय 55), काळेवाडी (वय 71 व 54), पिंपरी (वय 79), थेरगाव (वय 45), संत तुकारामनगर (वय 65), बोपखेल (वय 45), सांगवी (वय 62 व 27), चिंचवड (वय 50) आणि शहरातील महिला कासारवाडी (वय 34) येथील रहिवासी आहेत. 

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील महिला जुन्नर (वय 54) आणि पुरुष गावडेवाडी (वय 75), धुळे (वय 64), आंबेठाण (वय 77), खेड (वय 80 व 57), (चाकण वय 60) येथील रहिवासी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21 death in Pimpri-Chinchwad Corona Updates