
पिंपरी चिंचवड: सांगवी येथून बेपत्ता झालेल्या 21 वर्षीय मानसी प्रशांत गोविंदपुरकर हिचा मृतदेह अखेर लोहगडाच्या पायथ्याशी आढळून आला आहे. शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या मदतीने गुरुवारी घेरेवाडी परिसरातील झाडाझुडपांमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.