
पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी 223 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 92 हजार 774 झाली आहे. आज 393 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 88 हजार 972 झाली आहे. सध्या दोन हजार 160 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार व शहराबाहेरील पाच रुग्णांचा मृत्यू झाला.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी 223 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 92 हजार 774 झाली आहे. आज 393 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 88 हजार 972 झाली आहे. सध्या दोन हजार 160 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार व शहराबाहेरील पाच रुग्णांचा मृत्यू झाला.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 642 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 676 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील रुग्ण पुरुष चिंचवड (वय 79), पिंपरी (वय 35) व महिला चिखली (वय 74), थेरगाव (वय 82) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष सोलापूर (वय 88), खेड (वय 80), देहूगाव (वय 68) आणि महिला देहूरोड (वय 71), जुन्नर (वय 65) येथील रहिवासी आहेत.
...तर वायसीएम पुन्हा कोविड सेंटर
सध्या महापालिका रुग्णालयांत 846 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 314 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोन मधील एक हजार 418 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 573 जणांची तपासणी करण्यात आली. आज 438 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 71 हजार 266 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
Edited By - Prashant Patil