Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात 23 जणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

पिंपरी-चिंचवड शहरातील 14 व शहराबाहेरील नऊ, अशा 23 जणांचा आज मृत्यू झाला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 14 व शहराबाहेरील नऊ, अशा 23 जणांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील एकूण मृतांची संख्या एक हजार 388 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 532 झाली आहे. मृतांमध्ये चिंचवडमधील एक पुरुष व दोन महिला अशा तिघांचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात आज 449 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 81 हजार 372 झाली. आज 882 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 75 हजार 386 झाली आहे. सध्या पाच हजार 598 रुग्ण सक्रिय असून महापालिका रुग्णालयांत तीन हजार 57 रुग्ण दाखल आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष रुग्ण मोशी (वय 42), रावेत (वय 58), चिंचवड (वय 62), चिखली (वय 44), आकुर्डी (वय 70), दिघी (वय 44), कासारवाडी (वय 60), किवळे (वय 74), पिंपळे सौदागर (वय 58) आणि स्त्री रुग्ण चिंचवड (वय 63 व 58), किवळे (वय 57), आकुर्डी (वय 74), कुदळवाडी (वय 24) येथील रहिवासी आहेत. 

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष रुग्ण कुरुळी (वय 78 व 52), भवानी पेठ (वय 39), हिंगोली (वय 62), सातारा (वय 52), धानोरी (वय 73), मुंढवा (वय 65), खेड (वय 40) आणि महिला हडपसर (वय 56) येथील रहिवासी आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत 15 सप्टेंबरपासून शहरात घरोघरी सर्वेक्षण करून तपासणी केली जात आहे. त्यासाठी एक हजार 314 पथकांची नियुक्ती केलेली आहे. आजपर्यंत दोन हजार 84 व्यक्ती संशयित आढळले. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्यात 502 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 23 deaths due to corona in pimpri chinchwad