पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक; बाधितांचा आकडा आज चारशेच्या जवळ

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक; बाधितांचा आकडा आज चारशेच्या जवळ

पिंपरी : बुधवारी सायंकाळी सहापासून गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 392 रुग्ण आढळले. आजपर्यंत शहरातील हा सर्वाधिक आकडा ठरला आहे. 

शहरातील कोरोना बाधितांची संख्या गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत 3622 झाली आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 3230 जण पाॅझिटिव्ह आढळले होते. म्हणजेच बुधवारी सायंकाळी सहापासून गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत 392 रुग्णांची भर पडली. आज 115 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 1415 जण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत एकूण 2159 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 48 जणांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेली महिला पुण्यातील गोखले नगर येथील रहिवासी होत्या. त्यांचे वय 72 वर्ष होते. 

आज रुग्णालयात 1479 जण कोरोना तपासणी साठी दाखल झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील एकूण संशयित रुग्ण संख्या 2132 झाली आहे. आज दिवसभरात 1019 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. नवीन संशयित व सात दिवस उपचारानंतर पुनः तपासणी अशा 845 जणांचे रिपोर्ट प्रतिक्षेत आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फक्त 71 जणांत तीव्र लक्षणे

महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयांत सध्या 1405 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी फक्त 71 जणांमध्ये तीव्र लक्षणे आहेत. 30 जणांची प्रकृती गंभीर आहे. 1303 जणांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. 

टेस्टिंग वाढल्या

कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींचा लवकर शोध घेऊन त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यासाठी टेस्टिंग अर्थात तपासणीचे प्रमाण वाढविले आहे. त्यासाठी खाजगी लॅबची मदत घेतली जात आहे. सध्या रोज सरासरी 650 जणांच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. उद्यापासून वायसीएम रुग्णालयातही स्वॅब तपासणी केली जाणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी व सोबत किमान एक तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com