अबब ! थुंकीबहाद्दरांकडून तब्बल 24 लाख केले वसूल 

spit.jpg
spit.jpg
Updated on

पिंपरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे व मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेकडून 23 मार्चपासून दंडात्मक कारवाई सुरू आहे. बुधवारपर्यंत (ता. 9) पोलिसांच्या मदतीने आरोग्य विभागाने सात हजार 998 जणांवर कारवाई करून तब्बल 23 लाख सहा हजार 400 रुपये दंड वसूल केला आहे. 
कोरोनाचा प्रसार थुंकी व शिंकण्यातूनही होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना व सोशल डिस्टन्सिंग पाळताना तोंडाला मास्क लावणे आवश्‍यक आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी थुंकणेही गुन्हा आहे. अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याची कारवाई महापालिकेकडून सुरू आहे.

त्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पोलिसांची मदत मिळत आहे. थुंकल्यास पाचशे रुपये व मास्क नसल्यास दीडशे रुपये दंड आकारला जात आहे. तरीही मास्क न वापरता फिरणाऱ्यांचे व थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने दंडाची रक्कम एक हजार रुपये करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला केली आहे. मात्र, सध्या तरी पाचशे व दीडशे रुपयांप्रमाणेच दंड वसूल केला जात आहे. 

"ई' क्षेत्रीय कार्यालयाची कारवाई 
शहराच्या इतर भागाप्रमाणे चऱ्होली, मोशी, दिघी, बोपखेल, भोसरी या पूर्वेकडील उपनगरांतही कोरोना संसर्ग वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका ई क्षेत्रीय कार्यालयाने धडक कारवाई करीत एका दिवसात 46 जणांवर कारवाई केली. यात मास्क न वापरणाऱ्या 16 जणांकडून आठ हजार रुपये आणि थुंकणाऱ्या 30 जणांकडून साडेचार हजार रुपये दंड वसूल केला. कारवाईसाठी तीन पथके नियुक्त केली होती. त्यात मुख्य आरोग्य निरीक्षक अभिजित गुमास्ते, आरोग्य निरीक्षक राजू साबळे, चंद्रकांत रोकडे, सुधीर वाघमारे, रवींद्र जगताप, धनंजय गंगावणे, कैलास यादव, रवींद्र थोटा व सोमनाथ तुपे यांचा समावेश होता, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी राजेश भाट यांनी दिली. 

दृष्टिक्षेपात शहरातील कारवाई (23 एप्रिल ते नऊ सप्टेंबर) 
प्रकार/ व्यक्ती/दंडाची रक्कम 
थुंकणे /4836/ 7,25,400 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com