लोणावळेकर अडकले दुहेरी कात्रीत; एकीकडे रोजीरोटीचा प्रश्न तर दुसरीकडे...

lonavala.jpg
lonavala.jpg

लोणावळा : "एकीकडे रोजीरोटीचा प्रश्न तर दुसरीकडे कोरोनाच्या उद्रेकामुळे जगण्यासाठीची धडपड अशा दुहेरी कात्रीत पर्यटननगरी लोणावळा अडकली आहे. लोणावळ्यात सध्या कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. पर्यटननगरी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्याने डोकेदुखी वाढत आहे. लॉकडाऊन तर करायचा नाही, लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना करता येईल हे आव्हान आहे. गर्दी कायम ठेवून कोरोनावर नियंत्रण कसे ठेवता येईल हे ठरविण्याची लोणावळा, खंडाळ्यात वेळ आली आहे.

पर्यटकांना रोखणार कसे?
लोणावळा, खंडाळ्यासह मावळातील पर्यटनाची सर्वच ठिकाणे गेली सहा महीने पर्यटकांसाठी बंद ठेवली आहेत. मात्र, गेले सहा महीने उत्पन्नाचे साधन बुडाल्यामुळे अनेक कुटुंबांवर संकट ओढवले. त्यानंतर राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करत हॉटेल्स, रिसॉर्टस पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. मात्र ई पासची अट असल्याने प्रवास करण्यास अडथळे होते. अनलॉक ४ जाहीर करत सरकारने प्रवासासाठी ई पास ची अट काढून टाकली. त्यामुळे गेले सहा महीने कोंडलेले नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. गेल्या शनिवारी व रविवारी विकेंडला मुंबईसह परराज्यातून लोणावळा-खंडाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले.

पर्यटकांची तुडुंब गर्दी झाली. वाहतुकीची कोंडी अनुभवण्यास मिळाली. कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली. बाजारात होणारी नागरिकांची गर्दी, सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांना कोरोनाचा विसर पडल्याचेच चित्र होते. पर्यटकांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पर्यटकांची गजबजाट पर्यटनाच्या दृष्टीने, उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने ही गोष्ट दिलासादायक आहे. कोरोनाकाळात सुरक्षित राहत जगण्यासाठीची धडपड कायम तर दुसरीकडे जिवाची भीती कायम आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पर्यटकांना रोखणार कसे है मात्र आव्हान आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एकीकडे पर्यटन खुले करण्याची मागणी तर दुसरीकडे...

कोरोनामुळे पर्यटन बंदी करण्यात आली. यामुळे शहरी, ग्रामिण भागातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांपुढे संकट उभे राहिले. त्यामुळे संघटना स्थापन करत पर्यटनावरील बंदी उठविण्याची मागणी करण्यात आली. सध्या कोरोना उद्रेक झालेला पहावयास मिळत आहे. लोणावळ्सह सर्वच ठिकाणी कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा प्रचंड वाढत आहे. मृत्युदरात होत असलेली वाढ चिंताजनक आहे. कोरोनामुळे गेल्या आठवडाभरात राजकीय पदाधिकाऱ्यांसह जवळपास पंधरा जणांचा बळी गेला आहे. मृत्यु होत असल्याने लोणावळेकरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याबरोबर मृत्युचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान सध्या प्रशासनासमोर आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गर्दी कायम राहिली, कोरोना बाधितांची संख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मावळचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी लोणावळ्यात भेट देत कोरोना संदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेत सूचना केल्या आहेत. वाढत्या कोरोना संसर्गामुळे स्थानिक पातळीवर काही भागात चौदा दिवस जनता कर्फ्यू , लॉकडाऊन करण्यात आल्याच्या अफवांना सोशल मिडीयावर ऊत आला आहे. तर दोन दिवस जनता कर्फ्यू करता येईल का? याचीही चाचपणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. मात्र लॉकडाऊन साठी सध्या विरोध होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com