सॅनिटायझर वापरलं...मास्क अन् ग्लोजही घातले, तरी कोरोनानं गाठलं; तेही एक-दोन जणांना नव्हे...

टीम ई सकाळ
रविवार, 28 जून 2020

ते सॅनिटायझर वापरत होते. वेळोवेळी हात धुत होते. मास्क वापरत होते. प्रसंगी ग्लोजही वापरत होते, तरीही त्यांना कोरोनाने गाठले...

पिंपरी : ते सॅनिटायझर वापरत होते. वेळोवेळी हात धुत होते. मास्क वापरत होते. प्रसंगी ग्लोजही वापरत होते, तरीही त्यांना कोरोनाने गाठले... असे एक नव्हे, दोन नव्हे तब्बल पंचवीस जण आहेत. तेही महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी. इतकी काळजी घेऊनही त्यांना संसर्ग झाला मग, सर्व सामान्यांनी किती काळजी घ्यायला हवी, किती सावधानता बाळगायला हवी, याचा अंदाज येतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज दीडशेहून अधिक व्यक्तींना संसर्ग होतो आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या सत्तावीसशेच्या जवळपास पोचली आहे. मृत्यूदरही वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आरोग्य व वैद्यकीय विभाग कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहे. मास्क न वापरणाऱ्या आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू आहे. गर्दी करू नये, सोशल डिस्टंसिंग पाळावे, असे वारंवार आवाहन केले जात आहे. तरीही लोक ऐकत नाहीत. 'काय होतंय?' किंवा 'काही होत नाही' अशा आविर्भावात अनेक जण फिरताना दिसत आहेत. अशा व्यक्तींनी महापालिका कर्मचारी, अधिकारी यांचा आकडा बघावा की ज्यांनी कोरोना होऊ नये, यासाठी संपूर्ण खबरदारी घेतली तरीही त्यांना संसर्ग झाला आहे. 

हेही वाचा- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आर्किटेक्ट विद्यार्थ्यांचा 'हा 'पॅटर्न ठरणार महत्त्वाचा

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका सेवेतील पंचवीस जणांना कोरोना संसर्ग झालेला आहे. संसर्ग झालेल्यांमध्ये वायसीएमचे एक डॉक्टर आहेत. दोन नर्स आहेत. दोन वॉर्डबॉय आहेत. काही सफाई कर्मचारी आहेत. एक उपअभियंता आहेत. एक कनिष्ठ अभियंता आहेत. इतरांमध्ये महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागातील काही कर्मचारी आहेत. ते वेळोवेळी सॅनिटायझर वापरत होते. वेळोवेळी हात धुत होते. मास्क वापरत होते. प्रसंगी ग्लोज वापरत होते. डॉक्टर, नर्स व वॉर्डबॉय तर पीपीई किट वापरत होते.  तरीही त्यांना कोरोनाने गाठले आहे. या वरून त्याचे गांभीर्य आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. कोरोनापासून चार हात लांब राहण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळायला हवे. मास्क नियमितपणे वापरातला हवे. तरच आपण सुरक्षित राहू शकतो अन्यथा कोरोनाचे शिकार व्हायला वेळ लागणार नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 people corona infected in pimpri chinchwad corporation