मावळात आज २८ नवे पॉझिटिव्ह; कोणत्या भागात किती रुग्ण आहेत वाचा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जुलै 2020

मावळ तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येचा सिलसिला सुरूच असून, शुक्रवारी दिवसभरात २८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येचा सिलसिला सुरूच असून, शुक्रवारी दिवसभरात २८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्ण संख्या ७३२ वर पोचली आहे. त्यातील २७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या २८ जणांमध्ये वडगाव येथील सर्वाधिक सहा, कामशेत येथील चार, वराळे व इंदोरी येथील प्रत्येकी तीन, तळेगाव दाभाडे, कुसगाव बुद्रुक, ऊर्से, सोमाटणे व बधलवाडी येथील प्रत्येकी दोन; तर साते व बोरज येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७३२ झाली असून, त्यात शहरी भागातील ३३४, तर ग्रामीण भागातील ३९८ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक २२५, लोणावळा येथे ६४, तर वडगाव येथील रुग्ण संख्या ४५ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी १२ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या ४४१ सक्रिय रुग्ण असून, त्यात  २३० जण लक्षणे असलेले व २११ जण लक्षणे नसलेले आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लक्षणे असलेल्या २३० जणांपैकी १६४ जणांमध्ये सौम्य स्वरूपाची, तर ५७ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. आठ जण गंभीर तर एक जण अत्यवस्थ आहे. सध्या २२८ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असून, २१३ जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 28 new corona positive in maval