Coronavirus : आता कोरोना पोचलाय थेट एकविरा गडाच्या पायथ्याशी...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

ग्रामिण भागात रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

लोणावळा Coronavirus : मावळ तालुक्यातील अहिरवडे, नागाथली पाठोपाठ सलग तिसऱ्या दिवशी कार्ल्याजवळील एकविरा गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेहेरगाव येथे २८ वर्षीय तरुण कोरोना संक्रमित आढळल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामिण भागात रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाबाधित तरुण मूळचा सोलापूर येथील असून, तीन महिन्यांपूर्वी तो वेहेरगाव येथील एका हॉटेलमध्ये बदली कामगार म्हणून कामासाठी आला होता. या रुग्णास काही अंगरोगाने त्रास होत असल्याने तो रुग्णालयात जात होता. रुग्णामध्ये कोरोनाची लक्षण दिसू लागल्याने कार्ला प्राथमिक रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला औंध येथील जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल गुरुवारी (ता. २१) प्राप्त झाला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तहसीलदार मधूसुदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी वेहेरगाव येथे भेट देत पाहणी केली. बाधितास कोरोनाची लागण नेमकी कशी झाली, यांसदर्भात अद्याप उलगडा झाला नाही. सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोन तरुणांसह एका तरुणीस तपासणीसाठी पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 28 year old youth were corona positive found at vehergaon karla