esakal | पिंपरीतून आपल्या गावी जाणाऱ्या मजूरांची काय सोय केली पहा...
sakal

बोलून बातमी शोधा

worker.jpg

सध्या 10 गाड्यांमधून 300 मजूरांची पाठवणी करण्यात येत असून आणखी 432 मजूर स्थानकावर येणे अपेक्षित आहे.

पिंपरीतून आपल्या गावी जाणाऱ्या मजूरांची काय सोय केली पहा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : शहर परिसरात अडकून पडलेल्या कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार,छत्तीसगड राज्यांतील सुमारे 300 मजूर आणि स्थलांतरीत कामगार वल्लभनगर एसटी स्थानकामधून त्यांच्या मूळगावी पाठविण्यात आले. त्यासाठी 10 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. मात्र, त्याच बरोबर आंतर जिल्हा प्रवासाबद्दल कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे, नागरिकांनी एसटी स्थानकांत विनाकारण चौकशी करु नये, असे आवाहन आगार व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. 

आणखी वाचा - पुण्यात कोथरूड संदर्भात महापौर मोहोळ यांचा मोठा खुलासा

तसेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वल्लभनगर आगारामार्फत, परप्रांतीय मजूरांची मंगळवारपासून पोलीसांच्या सहाय्याने पाठवणी करण्यास सुरुवात झाली आहे. कर्नाटक बरोबरच छत्तीसगड, मध्यप्रदेश, बिहार राज्यांतील मजूरांना त्यांच्या मूळगावी पाठविण्यासाठी बुधवारी बसव्यवस्था करण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आगार व्यवस्थापक सुनील हिवाळे म्हणाले,""सध्या केवळ आंतरराज्य प्रवासी त्यांच्या गावी पाठविले जात आहेत. कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार येथील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच त्यांची पुन्हा थर्मल स्क्रिनिंगही करण्यात आली. हे मजूर परत पाठविल्यावर स्थानक परत निर्जंतुक केले जात आहे. त्यासाठी महापालिकेची मदत होत आहे. रस्त्यावर पायी चालत गावी जाणाऱ्या मजूर, स्थलांतरीत कामगारांनी जवळच्या आगार अथवा पोलीस ठाण्यात जावे. वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र मिळाल्यावर त्यांना एसटीने प्रवास करता येईल.

दरम्यान, सध्या 10 गाड्यांमधून 300 मजूरांची पाठवणी करण्यात येत असून आणखी 432 मजूर स्थानकावर येणे अपेक्षित आहे. आंतर जिल्हा बससेवा सुरु करण्याची नागरिकांकडून वारंवार मागणी होत आहे. परंतु, विभागीय कार्यालयाकडून तूर्तास त्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. तसे आदेश आल्यावर बससेवा सुरु केली जाईल.''  

मजूर मूळगावी जाण्यास अनुत्सुक ? 
काही परप्रांतीय मजूरांनी गावी जाण्यास पायीच वाटचाल सुरु केली आहे. तर काही मजूरांना त्यांच्या ठेकेदार, व्यावसायिकांनी पैसे देऊन थांबविले आहे. त्यामुळे, पोलीसांनी वारंवार बोलावून देखील काही मजूर मूळगावी परतण्यास इच्छूक नाहीत. त्यामुळे, पोलीसांकडील नावाची यादी आणि प्रत्यक्षातील परप्रांतीयांची संख्या यांच्यात वारंवार तफावत राहत आहे. त्यामुळे, गाड्या सोडण्यासही विलंब होत असल्याचेही सुनील हिवाळे यांनी सांगितले. 

आणखी वाचा - पुण्यात कोथरूड संदर्भात महापौर मोहोळ यांचा मोठा खुलासा

loading image