पिंपरीत लसीकरणासाठी आज ३१,८०० डोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीत लसीकरणासाठी आज ३१,८०० डोस
पिंपरीत लसीकरणासाठी आज ३१,८०० डोस शहरातील ६६ केंद्रांवर कोव्हिशिल्डचे २९,०००; कोव्हॅक्सिनचे २,८००

पिंपरीत लसीकरणासाठी आज ३१,८०० डोस

पिंपरी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी महापालिकेकडे ३१ हजार ८०० डोस उपलब्ध झाले आहेत. त्यात कोव्हिशिल्डचे २९ हजार व कोव्हॅक्सिनच्या दोन हजार ८०० डोसचा समावेश आहे. ते देण्याची व्यवस्था गुरुवारी (ता. ९) शहरातील ६६ केंद्रांवर केली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळवले आहे. कोव्हिशिल्ड लशीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर ५०० डोस उपलब्ध आहेत. तर, कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर साडेतीनशे डोस उपलब्ध आहेत. प्रत्येकी ५० टक्के डोस ऑन दि स्पॉट नोंदणी करून व किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन दिले जाणार आहेत.

सकाळी नऊ ते सायंकाळी सहा अशी लसीकरणाची वेळ आहे. मात्र, महापालिकेचे कुटे हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड, लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी आणि अण्णा भाऊ साठे विद्यालय संत तुकारामनगर पिंपरी या केंद्रांवर सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. या केंद्रांसह कोव्हिशिल्ड लस ५८ केंद्रांवर दिली जाणार आहे. ‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल.

हेही वाचा: शहरीकरण आणि सोशल मीडियाच्या जमान्यात लोककला लोप पावतेय का?

कोव्हॅक्सिनचे केंद्र

कोव्हॅक्सिन लस ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर दिली जाणार आहे.

गर्भवतींसाठी व्यवस्था

स्तनदा माता व गर्भवतींसाठी जुने भोसरी रुग्णालय, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, अण्णा भाऊ साठे विद्यालय संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्याबाई होळकर स्कूल सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे.

Web Title: 31800 Doses For Pimpri Vaccination Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PimpriDose
go to top