पिंपरी शहर परिसरात ३२ लाख वृक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tress in Pimpri Chinchwad

पिंपरी महापालिका उद्यान विभागाने हाती घेतलेले वृक्षगणनेचे काम अखेर दोन वर्षानी पूर्ण झाले आहे.

पिंपरी शहर परिसरात ३२ लाख वृक्ष

पिंपरी - महापालिका (Municipal) उद्यान विभागाने हाती घेतलेले वृक्षगणनेचे (Tree Counting) काम अखेर दोन वर्षानी पूर्ण झाले आहे. जीआयएस पद्धतीने (GIS Process) झालेल्या या गणनेतून शहरात ३२ लाख वृक्ष असल्याचे दिसून आले आहे. अ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वात कमी ३ लाख ६ हजार तर, इ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ८ लाख ४३ हजार झाडांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम १९७५ नुसार रस्त्याच्या कडेने किती वृक्ष असावेत याबाबत मानक ठरला आहे. २४ मीटर व अधिक रुंदीचे रस्ते असल्यास प्रत्येक दहा मीटर अंतरावर एक वृक्ष असणे आवश्यक आहे. बारा ते २४ मीटर रुंदीचे रस्ते असतील, तर रस्त्याच्या दुतर्फा दहा मीटर अंतरावर एक वृक्ष, सहा मीटर ते बारा मीटर रुंदीच्या रस्त्यावर प्रत्येक २० मीटर अंतरावर एक वृक्ष असला पाहिजे. हे निकष पिंपरी-चिंचवड महापालिका पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात आले. २००७ मध्ये केलेल्या वृक्ष गणनेत शहरात १८ लाख ९३ हजार झाडे आढळली होती. त्यावेळी वृक्ष गणना करण्यासाठी ९३ लाख रुपये खर्च आला होता. महापालिकेच्या वतीने वृक्षगणना नुकतीच पूर्ण झाली. त्यात ३२ लाख वृक्ष शहरात आहेत.

त्यात तब्बल १ लाख ५३ हजार ४४५ हेरिटेज ट्री असल्याची नोंद केली आहे. फ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सगळ्यात जास्त ४४ हजार, तर ड क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सगळ्यात कमी ५ हजार हेरिटेज ट्री असल्याचे अहवालात म्हटले आहे. यात झाडांची शास्त्रीय नावे दिली आहेत.

२०१८ पर्यंतचे वृक्षगणनेचे कंत्राट होते. मात्र, २०२० पर्यंत वृक्षगणनेचे काम सुरू राहिले. संबंधित कंत्राटदाराला आपण दंडही ठोठावला आहे. अडीच लाखापर्यंत दंड झाला आहे. शहरात एकूण ३२ लाख वृक्ष आहेत. आधी सहा प्रभाग होते. मात्र, गणना पूर्ण केलेली आहे. १ लाख ५३ हजार ४४५ हेरिटेज ट्रीची नोंद झालेली आहे. पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या अहवालात झाडांच्या जातीसह त्यांच्या वर्गीकरणाची माहिती प्रसिद्ध केली आहे.

- सुभाष इंगळे, उपायुक्त

Web Title: 32 Lakh Trees In Pimpri City Area

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :treePimpri Chinchwad