esakal | पिंपरी : ३५ शाळांना मिळाला ४२ टक्के शुल्क परतावा
sakal

बोलून बातमी शोधा

RTE School

पिंपरी : ३५ शाळांना मिळाला ४२ टक्के शुल्क परतावा

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी - गेल्या तीन वर्षांपासून आरटीई प्रवेशाचा (RTE School) थकित शुल्क परतावा (Fee Refund) अखेर खासगी शाळांना (Private School) मिळाल्याने आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा (Student) मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शहरातील ३५ शाळांना ४२ टक्के शुल्क परताव्याची रक्कम वितरित करण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात शाळांना दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. (35 Schools Get 42 Percent Refund Pimpri Chinchwad)

दुर्बल व वंचित घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशाची योजना आहे. या प्रवेशाचे शुल्क शासनाकडून संबंधित शाळांना वितरित केले जाते. यासाठी संबंधित शाळांकडून प्रस्ताव मागविले जातात. शहरातील एकूण १७० शाळांनी शैक्षणिक शुल्काच्या प्रतीपूर्तीसाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. पण यातही शाळांना प्रतिपूर्ती शुल्काबाबतच्या रक्कमेचा गोंधळ कायम आहे. त्यामुळेच सन २०१९-२० पासून पैसे शासनाकडून मिळाले नसल्याने यावर्षी शाळांनी प्रवेश न देण्याची भूमिका घेतली. त्यावर अनेकांनी न्यायालयातहीही धाव घेतली. दरम्यान, या प्रवेशासाठी शिक्षण विभागाने दोन वेळा मुदत वाढ केल्यानंतरही विद्यार्थ्यांचे प्रवेश होत नाहीत हे लक्षात आल्यानंतर शासनाने हालचाली सुरू केल्या. त्यात नुकताच सरकारने आदेश काढत ४२ टक्के तरी निधी तातडीने देण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे ३५ शाळांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: पिंपरी चिंचवड आयुक्त राजेश पाटलांचा अधिकाऱ्यांना दणका

तरीही शाळा प्रशासनाची ओरड

यावर्षी आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी ३४६४ विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. या प्रवेशासाठी २३ जुलै अखेरचा दिवस असूनही केवळ परतावा मिळत नाही, या कारणाने प्रवेश नाकारले जात आहेत. मध्यंतरीच्या कालावधीत शासनाकडून निधीच मिळाला नसल्याचे वितरण होऊ शकले नाही. काही महिन्यांपूर्वी निधी प्राप्त झाल्याने वितरण करावे, अशी मागणी संस्था चालकांनी शिक्षण विभागाकडे केली. ३५ शाळांना सन २०१९-२० या सत्रातील शुल्काचा परतावा बँक खात्यामार्फत करण्यात आल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले. अद्यापही शाळांना शुल्काचा परतावा मिळाला नसल्याचे शाळांचे म्हणणे आहे. पण शुल्कावरून शाळांची नाराजी पालकांना सोसावी लागत आहे.

  • पात्र शाळा १८०

  • पहिल्या टप्प्यात ३५ शाळांना निधी

  • एवढे देणार प्रवेश -३४६४

loading image