कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा अंत्यसंस्कार कसा करतात? या कोरोना योद्ध्यांचा हा व्हिडिओ पाहा...

कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा अंत्यसंस्कार कसा करतात? या कोरोना योद्ध्यांचा हा व्हिडिओ पाहा...
Updated on

पिंपरी : कोरोनाचा मृतदेह हातात मिळाला, की नातेवाईकही पाठ सोडत आहेत. अशा संवेदनशील परिस्थितीत बेवारस झालेल्या प्रत्येक मृतदेहावर माणुसकीच्या नात्याने अंत्यसंस्कार करणारेच खरे रिअल हिरो ठरत आहेत. अंतिम संस्काराच्या शेवटच्या क्षणापर्यंत पीपीई कीट घालून घामाने ओलेचिंब झालेले हे योद्धे कर्तव्यात कसूर न करता चोख भूमिका बजावित आहेत.

पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात मिळून आतापर्यंत 37 जणांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. पिंपरी, भोसरी व निगडी येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत हे अंत्यविधी केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी सांगवीतील विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध झाल्याने तेथे अंत्यविधी होत नाहीत. वायसीएम मरणोत्तर तपासणी विभागात तीन डॉक्‍टरांसह, मानधन व आस्थापनेवरील असे मिळून 14 जण काम करत आहेत. जवळपास फिरकायला ही कोणी तयार नसल्याने स्मशान दाखला व कागदपत्रांची पूर्तता देखील सध्या हीच मंडळी करीत आहेत. 

अंत्यसंस्कार करणाऱ्यांची व्यथा

एप्रिल महिन्यानंतर परिवार सोडून नातेवाईक व मित्रपरिवारात सर्वांना समजले की, आम्ही कोरोना मृतदेहाचे अंत्यसंस्कार करतो. त्यावेळी सर्वांनी आमच्याकडे तिरस्कृत भावनेने पाहिले. नियमित बोलणारे देखील आता आमच्याकडे कानाडोळा करत आहेत. मात्र, आम्ही घरी येताना पूर्णपणे स्वत:ला निर्जतुंक करतो. कुटुंबात असल्याने तेवढी काळजी घेतो. मात्र, मृतदेहाच्या नातेवाइकांपेक्षाही पलीकडचे नाते आमचे मृतदेहासोबत झालेले असल्याने एकही दिवस सुट्टी घेतली नाही, की गावाला गेलो नाही. 
आयसोलेशन कक्षात ठेवलेला मृतदेह  सॅनिटाइजने फवारणी करून प्लॅस्टिकमध्ये पूर्णपणे नखशिखांत गुंडाळून ब्लिच करण्यापर्यंतची प्रक्रिया पार पाडण्याचे काम आम्ही करत आहे. हा गुंडळालेला मृतदेह आम्हां दोन जणांनाही पेलवत नाही इतके ते जड होत आहे. त्यामुळे डॉक्‍टरही आमच्या मदतीला धावून येत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काय घेतली जाते दक्षता

सुरुवातीला रुग्णवाहिका निर्जंतुक केली जाते. मृतदेह पूर्णत: प्लॅस्टिकमध्ये गुंडळाल्यानंतर पीपीई कीट घालून मदतनिसांचे पूर्ण शरीर स्प्रे केले जाते. त्यानंतर रुग्णवाहिकेत बसल्यापासून ते अंत्यसंस्कार करेपर्यंत स्वत:ला बंदिस्त करून घेतलेले असते. अंत्यसंस्कार करून झाल्यानंतर थेट रुग्णालयात आल्यानंतर कीट काढून ते पूर्णपणे प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून नष्ट केले जाते. पुन्हा पूर्ण शरीर सॅनिटायजरने फवारणी करून निर्जुंतुक केले जाते.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे आहेत अंत्यविधीचे योद्धे 

डॉक्‍टर योद्धे - डॉ. रविंद्र मंडपे, डॉ. नितीन वाघमारे, डॉ. श्रीकांत शिंगे.

मदतनीस - संजय साबळे, अल्ताफ इफतेकारी, मोहन वाघमारे, विकी रेड्डी, किसन नांगरे, सुधाकर मोरे, संदीप पोंदकुले, राम रेड्डी, सचिन घोलप.

काय आहे कमतरता

अंत्यविधी व मृतदेह मदतीसाठी आणखी 16 जणांची मरणोत्तर विभागात तातडीने गरज आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com