पिंपरीत आणखी 38 नवे रुग्ण; आता अजंठानगर, नेहरूनगरमध्ये कोरोनाचा शिरकाव

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

- पिंपरीत आढळले आणखी 38 रुग्ण 
- आजंठानगर, नेहरूनगरमध्ये कोरोनाचा शिरकाव; परिसर सील 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा शिरकाव वाढतच आहे. शुक्रवारी (ता. 29) सायंकाळी सहा वाजेपर्यंत 38 नवीन रुग्णांची भर पडली. हे सर्व आनंदनगर, अजंठानगर, वाल्हेकरवाडी, रुपीनगर, बौद्धनगर, महात्मा फुलेनगर, भीमनगर, चऱ्होली, सांगवी, नेहरूनगर, दापोडी, वाकड येथील रहिवासी आहेत. तसेच, पुणे शहर व जिल्ह्यातील 11 रुग्ण महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात दाखल झाले आहेत. ते पुण्यातील कसबा पेठ, औंध, खडकी आणि जुन्नर, राजगुरूनगर, देहूरोड, आंबेगाव, सोलापूर येथील रहिवासी आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाबाधित रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सायंकाळपर्यंत आढळलेल्या 38 रूग्णांमुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या 498 झाली तर, पुणे व इतर ठिकाणच्या 11 रुग्णांसह त्यांची संख्या 83 झाली आहे. आजपर्यंत शहरातील 224 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर, 266 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, शहरातील रहिवासी परंतु, शहराबाहेर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 31 आहे. त्यामुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या 529 झाली आहे. तसेच, शहराबाहेरी रहिवासी मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये उपचार घेणारे 25 जण आजपर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 36 जण उपचार घेत आहेत. तर, बारा जणांचा मृत्यू झालेला आहे. आज मृत्यू झालेले दोन जण सांगवी व जुन्नर येथील रहिवासी होते. वायसीएम व भोसरी रुग्णालयात आज 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. चिखली, आनंदनगर, पुण्यातील शिवाजीनगर व बीड येथील हे सर्व जण रहिवासी होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज सील केलेले भाग  :

अजंठानगर : सिद्धार्थ बिल्डिंग- अमृतकृपा सोसायटी- ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- विनोद व्हरायटी. 

नेहरूनगर : कुलदीप अंगण सोसायटी- तरटे किराणा दुकान- लक्ष्मी टेक्‍लॉक्‍स परिसर 

पिंपरी : सोनकर चेंबर्स- गरीब नबाब हॉटेल- गर्ग प्रोव्हिजन स्टोअर्स- नानल हॉस्पिटल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 38 new corona positive were found in ajanthanagar, nehrunagar at pimpri chinchwad city