पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील चारशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

पिंपरी-चिंचवड पोलिस दलात मोठे फेरबदल केले असून, पोलिस आयुक्तांनी एकाच दिवशी तब्बल 399 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस दलात मोठे फेरबदल केले असून, पोलिस आयुक्तांनी एकाच दिवशी तब्बल 399 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये पोलिस शिपाई ते सहायक उपनिरीक्षकांचा समावेश आहे. आयुक्तालय स्थापन झाल्यापासून प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात अंतर्गत बदल्या केल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शहरासाठी 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यापासून कृष्णा प्रकाश हे तिसरे आयुक्त ठरले. 5 सप्टेंबर रोजी त्यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महिन्याच्या आतच त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्याचा निर्णय घेतला. या बदल्यांमध्ये आयुक्तालय स्थापन झाल्यापासून अथवा त्याअगोदरपासून एकाच ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. पोलिस ठाणे, वाहतूक शाखा, आयुक्‍तालयासह विविध विभागातील तेरा सहायक उपनिरीक्षक, 122 हवालदार, 157 पोलिस नाईक, 107 शिपाई यांची बदली करण्यात आली. एकाच दिवशी इतक्‍या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्याने खळबळ उडाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 400 police transfer in pimpri chinchwad Police commissionerate