९० झाडांची कत्तल, कंपनीकडून ४५ लाख रुपये दंड वसूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

45 lakhs fine from Formica company due to cutting 90 trees pimpri Municipal Corporation

९० झाडांची कत्तल, कंपनीकडून ४५ लाख रुपये दंड वसूल

पिंपरी : महापालिकेची परवानगी न घेता ९० वृक्षांची कत्तल करणाऱ्या आकुर्डी येथील मे. फॉरमायका कंपनीवर महापालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. तब्बल ४५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेने ही सर्वात मोठी कारवाई केली आहे. पिंपरी महापालिका कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ अमलात आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील कोणत्याही वृक्षांचा विस्तार कमी करणे, वृक्षतोड करणे, वृक्ष पुनर्रोपन करणे पालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. मात्र, आकुर्डीतील मे. फॉरमायका कंपनीने अनधिकृतपणे वृक्ष काढलेली आहेत.

या जागेवर वृक्ष गणनेच्या माहितीच्या आधारे असलेले वेगवेगळया प्रजातीचे एकूण ९० वृक्ष जे. सी. बी. च्या सहाय्याने मुळासह उखडून काढल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. ही बाब महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी अत्यंत गांभिर्याने घेतली. महापालिकेच्या उद्यान विभागाने मे. फॉरमायका कंपनीला एका वृक्षाकरिता ५० हजार रुपयांप्रमाणे ९० वृक्षांच्या दंडापोटी ४५ लाख रुपयांची नोटीस बजावली होती. कंपनीचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका उद्यान विभागाने सांगितले होते. त्यानुसार आजरोजी महापालिकेने मे. फॉरमायका कंपनीवर दंडात्मक कारवाई केली. ९० वृक्षांसाठी त्यांच्याकडून तब्बल ४५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, असा खुलासा आयुक्त राजेश पाटील यांनी केला आहे.

Web Title: 45 Lakhs Fine From Formica Company Due To Cutting 90 Trees Pimpri Municipal Corporation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..