पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील 47 कंटेन्मेंट झोन कोणते, पाहा...

मंगेश पांडे
शुक्रवार, 22 मे 2020

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोनाचा रुग्ण आढळणारा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला जात आहे. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 47 कंटेन्मेंट झोन आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 45 तर तळेगाव दाभाडे व माळवाडी येथील प्रत्येकी एका कंटेन्मेंट झोनचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील कंटेन्मेंट झोन (पोलिस ठाणेनिहाय) - 

सांगवी पोलिस ठाणे- 

* कृष्णराज कॉलनी परिसर, पिंपळे गुरव (पवना नदी किनारा-दत्त मंदीर-भारत गॅस एजन्सी), 
* मधुबन सोसायटी, जुनी सांगवी (मुळा नदी-कामठे फूड सर्व्हिसेस-सीक्‍युऐई बोर्डर-कैलास स्वीट-इंडियन पेट्रोल पंप), 
* शुभश्री रो हाऊस सोसायटी परिसर, पिंपळे सौदागर (कुणाल आयकॉन रोड-एमएसईबी कार्यालय-ओम दत्तराज मंदीर-रोझवुड सोसायटी-ओम चैतन्य डेअरी-पकवान स्विटस), 
*साठफुटी रोड, जगताप कॉम्प्लेक्‍स परिसर, पिंपळे गुरव (तुळजाभवानी मंदीर-साठ फुटी रोड-भालचंद्र हॉस्पिटल-निलम सुपर मार्केट-गणेश मंदिर-माऊली हॉटेल-श्री गणेश डेअरी-तुळजाभवानी मंदिर), 
* विनायकनगर, पिंपळे गुरव (भक्ती-शक्ती दर्शन-पुष्पांजली अपार्टमेंट-पाण्याची टाकी-काटेपुरम चौक-अखिल क्रांती चौक-एम.के. चौक-शिंदेशाही हॉटेल-भक्ती दर्शन सोसायटी), 
* बुद्धघोष सोसायटी, जुनी सांगवी (न्यु युनिटी मेडीकेअर-यशराज रेसीडेन्सी फेज-1-गणेश बेकरी-वाघमारे रोड-हर्षल इलेक्‍ट्रीकल-शिवगंगा कॉम्प्लेक्‍स), 
*साई पॅराडाईज, पिंपळे सौदागर (साई साहेब सोसायटी शेजारी-अंतर्गत रस्ता-न्यु पुना बेकरी-शिवसाई लेन रोड), 
*कवडेनगर, पिंपळेगुरव (एम.के. चौक-गणेश मंगल कार्यालय-शिंदेशाही हॉटेल-लिटल स्टार स्कूल-भवानी माता मंदीर-श्री गणेश सहकारी बॅंक-अखिल क्रांती चौक), 

चिखली पोलिस ठाणे - 

*रूपीनगर परिसर (दिपक ग्लास सेंटर-स्वामी समर्थ मठ-त्रिवेणी चौक-भक्ती-शक्‍ती बस डेपो), 
*तळवडे, रूपीनगर (अंकुर सुपर मार्केट-श्रीराज हॉस्पिटल-सिद्धार्थ इंजिनियर्स-ज्योतिबा मंदीर-भवानी सुपर मार्केट-जिओमेट्रीक ऍटोमेशन), 
*पंचदुर्गा सहकारी गृहनिर्माण संस्था, रूपीनगर (सिद्धीविनायक गणपती मंदिर-मिनारा मस्जिद-माऊली मेडिकल-हमराज टेलर्स-रूपीनगर पोस्ट ऑफिस-रूपीनगर रोड), 
*मोरे वस्ती, चिखली (ओम मिनी मार्केट-अष्टविनायक चौक-एॅक्‍सीस बॅंक एटीएम-तुषार पान सेंटर-कल्पना टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स), ताम्हाणे वस्ती, त्रिवेणीनगर (मोरया विनायक मेडिकल-श्री महालक्ष्मी ट्रेडर्स-श्री स्वामी समर्थ स्नॅकसमोर-त्रिवेणीनगर रोड-म्हेत्रेवाडी उद्यान-जलशुद्धीकरण केंद्र). 

एमआयडीसी भोसरी पोलिस ठाणे- 

*गंधर्वनगरी परिसर मोशी (जय हनुमान ट्रेडर्स-हॉटेल सुर्योदय-मोशी कचरा डेपो- पुणे-नाशिक हायवे), 
*वुडस व्हिले, मोशी (वुडस व्हिले सोसायटी बॉर्डर, वुडस व्हिले ऑफिस-साई फॅब्रोटेक-हॉटेल शेअरिंग स्पुन-आर्या हॉस्पिटल-डीपी रोड), 
*बनकरवस्ती, मोशी (मोशी टाय स्ट्रीट जाधववाडी रोड-बनकरवस्ती रोड-नाशिक रोड). 

दिघी पोलिस ठाणे- 

* महालक्ष्मी अपार्टमेंट, रूणवाल पार्क, दिघी (कोकण मराठा संघ गृह-शहीद भगतसिंग मार्ग-त्रिमुर्ती सुपर मार्केट-श्री रविशंकर अपार्टमेंट), 
* साठेनगर, चऱ्होली (चऱ्होली बु.रोड-हायस्कुल रोड-हिंदवी एन्टरप्रायजेस-रोहन झेरॉक्‍स सेंटर), 
* अमृतधारा, दिघी (विठ्ठल-रुक्‍मिणी मंदीरासमोर-सेनेसिस चऱ्होली समोर-आळंदी रोड-ममता स्विटस), 
* अलंकापुरम रोड (श्री समर्थ गॅरेज-शिवराज ग्रीन टॅक-नील मोटर्स), 
* निकम वस्ती, चऱ्होली बुद्रुक (स्मशानभुमी रोड-निकम वस्ती-चऱ्होली बुद्रुक-निरगुडीरोड), 

पिंपरी पोलिस ठाणे- 

*इंदिरानगर परिसर, चिंचवड (इंदिरानगर झोपडपट्टीमधील भाग-महिंद्रा टु व्हिलर शोरूम-चिखली-कस्पटेवस्ती बीआरटीएस रोड-सरस्वती कॉ.ऑप बॅंक-डबल ट्री हॉटेल-आयबीएमआर कॉलेज-तेजस एंटरप्रायजेस-सायन्स पार्कमागील बाजू), 
* मोहननगर, चिंचवड (श्रीराम सुपर मार्केट-श्रीराम चौक-टाटा मोटर्स सर्व्हिसिंग सेंटर-वसंत इंडस्ट्रिज-चिखली कस्पटेवस्ती बीआरटी टेल्को रोड-जम्बो किंग हॉटेल-एचडीएफसी बॅंक एटीएम), 
* भाटनगर (किर्वे टेलरसमोर-रेल्वे लाईन-राधिका अपार्टमेंट-डायमंड स्पोर्टस-लिंकरोड), खराळवाडी (शिवम रेडियम-मयुर सुपर मार्केट-स्वरामई गार्डन-युको बॅंक शाखा-मुंबई-पुणे महामार्ग-हॉटेल क्रिस्टल कोर्ट), 

निगडी पोलिस ठाणे- 

* कमलनयन बजाज शाळेजवळ, जी ब्लॉक संत ज्ञानेश्‍वर हौसिंग सोसायटी, संभाजीनगर, चिंचवड (रोटरी क्‍लब ऑफ चिंचवड-संभाजीनगर रोड-रॅडिश हॉटेल-शिवाजी पार्क लिंक रोड-मनसुख सुपर मार्केट-अंब्रेला गार्डन रोड-निगडी-भोसरी रोड), शुभश्री हौसिंग सोसायटी, आकुर्डी (शुभश्री हौसिंग सोसायटी-जय गणेश हॉटेल-मदिना मस्जिद-सदगुरू अपार्टमेंट-आकुर्डी मेन रोड-खंडोबा माळ चौक-जय गणेश व्हिजन-हॉटेल आंगण), 
* संभाजीनगर परिसर (तुळजाभवानी मंदिर-बालेश्‍वर हौसिंग सोसायटी-अम्रेला गार्डन-श्री सिद्धीविनायक मंदीर-व्हिजनमार्क बायोटेक-बर्ड व्हॅली तलाव-महात्मा फुले कॉलेज-साकेत हौसिंग सोसायटी-शिवम मेडीकल-सुबोध विद्यालय), 

वाकड पोलिस ठाणे - 

* काळेवाडी परिसर (दत्तोबा काळे शाळा-मदर टेरेसा उड्डाणपुल-पवना नदी-काळेवाडी फाटा-काळेवाडी पिंपरी पुल-सेवा विकास बॅंक-आदर्श चौक), 
* तांबे शाळा रहाटणी (नंदू जाधव उद्यानासमोर-भिकोबा तांबे शाळा-नम्रता क्रिस्टल पार्क सोसायटी), 
* ज्ञानगंगा सोसायटी, रहाटणी (श्री गार्डन टी स्पॉट-निर्मला बंगला-आर.आर.जी.2 सोसायटी रोड-रॉयल रहार्डका ग्रीन्स फेज-2-रॉयल ऑरेंज काऊंटी रोड), 
* तापकीर चौक, काळेवाडी परिसर (हॉटेल गुरूदत्त-एसबीआय एटीएम-शिवसेना कार्यालय-ओंकार लॅमिनेट-बेबीज इंग्लिश स्कूल-तुळजाभवानी मंदीर-बेंगलोर अय्यंगार बेकरी), 
* कस्पटेवस्ती, वाकड (सोनिगरा केसर बिल्डिंग-7- ऍलियन हॉटेलसमोर-कस्पटेवस्ती रोड-छत्रपती रोड-सोनिगरा सोसायटी रोड), 
* छत्रपती चौक, रहाटणी (श्री नंदा क्‍लासिक-सिद्धीविनायक मंदीर-रेणुकामाता मंदीर, बसेरा रेसीडेन्सी-जीवन क्‍लिनिक). 

भोसरी पोलिस ठाणे - 

* चक्रपाणी वसाहत, भोसरी (संत ज्ञानेश्‍वर इंग्लिशन मिडियम स्कूल-शिवकृपा बेकरी-ओम साई स्टोअर-नंदनवन चौक-अंबिका सुपर लॉन्ड्री), 
* फुगेवाडी परिसर (महा-ई सेवा केंद्र- पुणे मुंबई महामार्ग-श्रद्धा बेकरी-आझाद हिंद मंडळ-श्री स्वामी समर्थ मंदीर), 
* हनुमान कॉलनी (फॅन्सी कॉम्प्युटर पेरिफेरल्स-दुर्गामाता मंदीर-राजगुरू बॅंकेसमोर), 
* क्षितीज डेस्टिनेशन, भोसरी (भारत पेट्रोलियम पंप-ग्लोबल स्कूल-दुर्वांकुर लॉन्समागील बाजू-बनाचा ओढा-सिमेंट ग्राऊंड), 
* हुतात्मा चौक (न्यु जनता बेकरी-भोसरी-आळंदी रोड-श्री बालाजी मंदीर-मार्केट रोड), 
* गुरूविहार कॉलनी (गुरूविहार कॉलनी गार्डन-महादेव मंदीर- पुणे-नाशिक महामार्ग-एसबीआय एटीएम-ई प्रभाग क्षेत्रिय कार्यालय), लांडगेनगर (ऍक्वा गणेश कॉर्नर-स्पेरोनी इंडिया प्रा.लि-पुणे-नाशिक महामार्ग-स्वस्तिक ज्वेलर्स). 

देहूरोड पोलिस ठाणे - 

* विकासनगर, किवळे (छत्रपती शिवाजी महाराज चौक-विकासनगर मेन रोड-गणेश मंदीर-वामन स्मृती हौसिंग सोसायटी-सुमन मंगल केंद्रासमोर-श्रीनगर रोड). 

चिंचवड पोलिस ठाणे - 

* आनंदनगर, चिंचवड स्टेशन (चिंचवड स्टेशन रोड-स्टार बेस्ट बेकरी-जुना मुंबई-पुणे महामार्ग-कार्निव्हल सिमेमाची मागील बाजू-प्रिमियर कंपनीमागील बाजू-मालधक्का भिंत-मालधक्का रोड-चिंचवड स्टेशन रोड). 

तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे - 

* तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रभाग क्रमांक 2 मधील परिसर (दिपाली अपार्टमेंट ते माताडे यांचे घर-राधा कृष्ण मंदीरमार्गे नाना भालेराव कॉलनी प्रवेशद्वार (चाकण रस्ता)-चाकण रोडमार्गे ते मराठा क्रांती चौक-मायमर कॉलेज कंपांऊंड ते दिपाली अपार्टमेंट. 

तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाणे - 

* माळवाडी व इंदोरी ही गावे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 47 containment zones of the Pimpri chinchwad Commissionerate of Police