मावळात आज ४८ नवे पॉझिटिव्ह; रुग्ण संख्येचा चढ-उतार सुरूच

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

मावळ तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येचा चढ-उतार सुरूच असून, मंगळवारी दिवसभरात नव्याने ४८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येचा चढ-उतार सुरूच असून, मंगळवारी दिवसभरात नव्याने ४८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. कुसगाव बुद्रुक येथील कोरोनाबाधित ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ५ हजार ५८ झाली आहे. आतापर्यंत १७३ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ हजार २७३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी ४९ जणांना घरी सोडण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ४८ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक १४, तळेगाव दाभाडे ग्रामीणमधील आठ, लोणावळा येथील सात, वडगाव येथील सहा, कामशेत येथील पाच, टाकवे बुद्रुक येथील दोन, कुसगाव बुद्रुक, माळवाडी, वराळे, कान्हे, नवलाख उंब्रे व वाकसई येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५ हजार ५८ झाली असून, त्यात शहरी भागातील दोन हजार ९७० व ग्रामीण भागातील दोन हजार ८८ जणांचा समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तळेगावात सर्वाधिक एक हजार ५२१, लोणावळा येथे एक हजार १४० व वडगाव येथे रुग्णसंख्या ३०९ झाली आहे. आतापर्यंत १७३ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ हजार २७३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी ४९ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ६१२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ३७० लक्षणे असलेले तर २४२ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ३७० जणांमध्ये ३०० जणांमध्ये सौम्य तर ६६ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. चार जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ६१२ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 48 new corona positive found in maval