esakal | पिंपरी-चिंचवड शहरात आज 49 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड शहरात आज 49 जणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी 856 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले.

पिंपरी-चिंचवड शहरात आज 49 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी 856 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 74 हजार 116 झाली आहे. 

आज 931 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 65 हजार 132 झाली आहे. सध्या रूग्णालयात सहा हजार चार जण उपचार घेत आहेत. आज 49 जणांचा मृत्यू झाला. शहरातील एकूण मृतांची संख्या एक हजार 229 झाली आहे. 

महापौर ढोरे म्हणतायेत, 'पिंपरी-चिंचवडमधील कोरोना स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न' 

आज मयत झालेल्या व्यक्ती चऱ्होली (पुरुष ७१ वर्षे), रहाटणी (पुरुष ४३ वर्षे), नेहरूनगर (स्त्री ६५ वर्षे), मोशी (पुरुष ३८ वर्षे), खराळवाडी (स्त्री ७२ वर्षे), वाकड (स्त्री ५४ वर्षे, पुरुष ८२ वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ५३ वर्षे), थेरगांव (पुरुष ५६ वर्षे, पुरुष ५५ वर्षे), काळेवाडी (पुरुष ५८ वर्षे), दिघी (पुरुष ६२ वर्षे), देहूरोड (पुरुष ६३ वर्षे), चिंचवड (पुरुष ६५ वर्षे पुरुष ३६ वर्षे , पुरुष ६५ वर्षे), कुदळवाडी (स्त्री  ६० वर्षे), भोसरी (पुरुष ४३ वर्षे), आकुर्डी (स्त्री ६५ वर्षे , स्त्री ५८ वर्षे), काळेवाडी (स्त्री ३५ वर्षे), निगडी (पुरुष  40 वर्षे), पिपळे निलख (पुरुष ५१ वर्षे), शिवणे (स्त्री ६८ वर्षे), पुणे (पुरुष ५२ वर्षे), सिंहगड रोड (पुरुष ८० वर्षे), चाकण (पुरुष ४० वर्षे), आंबेगांव (पुरुष ७१ वर्षे , स्त्री ६० वर्षे), धायरी (पुरुष ८३ वर्षे), खेड ( पुरुष ४९ वर्षे, पुरुष ७० वर्षे, पुरुष ५५ वर्षे, पुरुष ५९ वर्षे, पुरुष ४२ वर्षे), सोमाटणे फाटा (स्त्री ५५ वर्षे), कोल्हापूर (पुरुष ६९ वर्षे), सातारा (पुरुष ६७ वर्षे, स्त्री ४५ वर्षे), लोणीकंद (पुरुष ५२ वर्षे), शिरुर (पुरुष ५९ वर्षे, पुरुष ८१ वर्षे), बार्शी (पुरुष ५८ वर्षे), नारायणगांव (स्त्री ७२ वर्षे), बालेवाडी (पुरुष ४१ वर्षे), कात्रज (पुरुष ५४ वर्षे), जुन्नर (पुरुष ७२ वर्षे, पुरुष ६४ वर्षे), खडकी बाजार (स्त्री ७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.

loading image
go to top