नॉन कोविड रुग्णांसाठी उपलब्ध होणार 50 टक्के बेड; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

  • रुग्ण कमी झाल्याने महापालिकेचा निर्णय 

पिंपरी  : सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून कोरोना संसर्ग कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे महापालिकेने पाच कोविड केअर सेंटर बंद केली आहेत. आता केवळ बारा सेंटर सुरू आहेत. तीही टप्प्याटप्प्याटने बंद केली जाणार आहेत. तसेच, महापालिकेचे आठही रुग्णालये पन्नास टक्के क्षमतेने नॉन कोविड केली जाणार आहेत. अन्य साथीच्या विकारांवर त्यात उपचार केले जाणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महापालिकेचे शहरात वायसीएम, भोसरी नवीन, चिंचवडचे तालेरा व पिंपरीतील जिजामाता यांसह आकुर्डी, यमुनानगर, थेरगाव, सांगवी येथे रुग्णालये आहेत. मार्चपासून हे आठही रुग्णालये कोविडसाठी अधिग्रहीत केली आहेत. त्यामुळे इतर साथीचे व अन्य आजारांसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयांत जावे लागत आहेत. मात्र, आता महापालिकेची सर्व रुग्णालयांतील 50 टक्के बेड नॉन कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच, वायसीएम रुग्णालयातील रुबी अलकेअर सेंटरही सुरू केले जाणार आहे. यामुळे नागरिकांची सोय होणार असून, अन्य आजारांवरही पूर्वीप्रमाणे कमी शुल्कात उपचार होणार आहेत. 

पिंपरी-चिंचवड : ताथवडेतील रस्त्याचा डाव भाजपच्याच अंगलट

नागरिक म्हणतात... 
विशाल गायकवाड म्हणाले, "माझ्या शेजारील आजी तीन महिन्यांपूर्वी घरात घसरून पडल्या होत्या. त्यांच्या एका गुडघ्याला व हाताला मार लागला होता. घरापासून जवळच वायसीएम हॉस्पिटल असल्याने त्यांना घेऊन गेलो. पण, तिथे कोरोना पेशंट होते. आजींवर उपचार करण्यास डॉक्‍टरांनी नकार दिला. अखेर खासगी दवाखान्यात उपचार करावे लागले.'' 

कोविडचा संसर्ग आता कमी होत आहे. मात्र, हवामानातील बदलामुळे अन्य साथीचे आजार होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेची आठ रुग्णालये 50 टक्के क्षमतेने नॉन कोविड करण्याचा निर्णय घेतला आहे. 
- संतोष लोंढे, अध्यक्ष, स्थायी समिती 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 percent beds will be available for non-covid patients in pimpri chinchwad