
वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे, असे चित्र सर्रास दिसते.
पिंपरी - वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे, असे चित्र सर्रास दिसते. परंतु याबाबत केवळ 53 जणांनीच महावितरणकडे तक्रार नोंदवली आहे. त्यापैकी 43 तक्रारींचे तत्काळ निवारण करून 10 तक्रारी प्रशासकीय मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.
वीज सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईलच्या "व्हॉटस्ऍप'द्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. पुणे परिमंडळ अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 7875767123 हा व्हॉटस्ऍप क्रमांक उपलब्ध केला आहे. या क्रमांकावर महावितरणची तुटलेली वीजतार, जमिनीवर लोंबकळत असलेले झोल, उघड्या पडलेले फ्यूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकणे, रोहित्रांचे उघडलेले कुंपण, खोदाईमुळे भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे, अशा स्वरूपाची माहिती-तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह व्हॉटस् ऍपवर पाठवायची आहे. परंतु नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याने तक्रारी कमी झाल्या आहेत. नागरिकांनी या क्रमांकावर कॉल करण्याऐवजी व्हॉटस्ऍप किंवा "एसएमएस'द्वारे माहिती द्यायची आहे.
पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर 'राडा'; दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले
अशी होतेय कार्यवाही
व्हॉटसऍपद्वारे प्राप्त झालेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येते. वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधित तक्रारकर्त्यांना व्हॉटसऍपद्वारेच दुरुस्तीनंतरच छायाचित्र पाठवून कळविण्यात येत आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधित तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीजसुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
आकडे बोलतात
- विभाग - तक्रारी - सुटलेल्या तक्रारी - प्रलंबित
-भोसरी - 30- 21-9
-पिंपरी-23-22-1