पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर 'राडा'; दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021

दुपारी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी कुसेगाव मतदान केंद्र परिसरात भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.

पाटस (पुणे) : दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मतदान केंद्राच्या बाहेर सकाळी दहा वाजता काही कारणास्तव दोन्ही गटाच्या काही कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ धक्काबुक्की आणि बाचाबाचीचा प्रकार घडला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती निवळली. मात्र, दिवसभर तणावपूर्ण शांतता होती.

अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई​ 

कुसेगाव येथे ग्रामपंचायतीचे एकूण तीन प्रभाग असून मतदार संख्या २३०० आहे. सध्य़ा ग्रामपंचायतीच्या नऊ जागेसाठी ३ अपेक्षांसह एकूण २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. सकाळी जिल्हा परीषद शाळेत मोठ्या शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळपासूनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची मतदारांना केंदावर घेऊन येण्यासाठी लगबग सुरू होती. मतदान शांततेत सुरू असताना सकाळी दहा वाजता एक उमेदवार केंद्राच्या बाहेर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना चिन्ह सांगत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

Pune Gram Panchayat Election Live Updates : तिसऱ्या टप्प्यातही भोर आघाडीवर; 60.41% मतदान​

यावर विरोधी गटाच्या काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. या मुद्यावरुन दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. नंतर दोन्ही गटाचे कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली. मात्र, बाचाबाचीचे स्वरुप वाढून लागल्याने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते शांत झाले. माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. सर्व कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले.

दुपारी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी कुसेगाव मतदान केंद्र परिसरात भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. दिवसभर मतदान केंद्रावर तणावपूर्ण शांतता होती. याबाबत पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील म्हणाले, किरकोळ कारणावरुन दोन्ही गटातील काही कार्यकर्त्यांमध्ये केवळ बाचाबाचीचा प्रकार घडला आहे. याबाबत दोन्ही गटाकडून कसलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Election Clashes between activists of both groups at Kusegaon polling station