मावळात आज कोरोनाबाधितांचा उच्चांकी आकडा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

मावळ तालुक्यात गुरुवारी दिवसभरात उच्चांकी ६० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात गुरुवारी दिवसभरात उच्चांकी ६० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या दोन हजार १५१ झाली आहे. आतापर्यंत ८३ जणांचा मृत्यू झाला असून, एक हजार ५६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी १२५ जणांना घरी सोडण्यात आले.

Breaking : शरद पवार अचानक पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर; जम्बो हॉस्पिटलची केली पाहणी

गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ६० जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक १८, कामशेत येथील १२, लोणावळा येथील १०, वडगाव येथील पाच, काले येथील चार, माळवाडी व वराळे येथील प्रत्येकी दोन; तर कुसगाव बुद्रुक, धामणे, इंदोरी, सुदुंबरे, सुदवडी, नाणे व येळसे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजार १५१ झाली असून, त्यात शहरी भागातील एक हजार १५७; तर ग्रामीण भागातील ९९४ जणांचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवडकरांनो! महापालिका आयुक्तांनी लागू केली नवीन नियमावली

तळेगावात सर्वाधिक ७४४, लोणावळा येथे २६८, तर वडगाव येथे रुग्ण संख्या १४५ एवढी झाली आहे. आतापर्यंत ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच,  एक हजार ५६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी १२५ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात सध्या ५०८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ३४१ जण लक्षणे असलेले, तर १६७ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ३४१ जणांपैकी २४१ जणांमध्ये सौम्य व ८३ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १७ जण गंभीर आहेत. सध्या ५०८ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 60 people tested corona positive in maval taluka on thursday 3 september 2020