Breaking : शरद पवार अचानक पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर; जम्बो हॉस्पिटलची केली पाहणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग आलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी महापालिका वॉर रूम, नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम व चिंचवड स्टेशन येथील ऑटोक्लस्टर एक्झिबेशन सेंटर येथे उभारलेल्या जम्बो फॅसिलिटी रुग्णालयाची पाहणी केली. 

पिंपरी-चिंचवडमध्ये वैद्यकीय कचरा वाढतोय; सहा महिन्यांत कोविडचा 'एवढा' कचरा जमा

''आपल्याकडे सध्या किती बेड उपलब्ध आहेत,'' असे शरद पवार यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारले. त्यावर हर्डीकर म्हणाले, ''सध्या पाच हजार बेड उपलब्ध आहेत. पुढील आठ दिवसांत ही संख्या आठ हजार बेड पर्यंत नेण्याचे नियोजन आहे.''

एका पॉझिटिव्ह रुग्णामागे वीस जणांची तपासणी करा : पवार

''एक व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील किती व्यक्तींची तपासणी करता," असे पवारांनी विचारले असता, हर्डीकर म्हणाले, "एक व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्या हायरिस्क काॅन्टॅक्टमधील चौदा जणांची तपासणी केली जाते." हे चांगले प्रमाण आहे. मात्र, तपासणी संख्या वीसपर्यंत वाढवा, असं पवारांनी सांगितलं.

कोरोना वाॅर रूमची पाहणी केल्यानंतर आयुक्त हर्डीकर यांच्याकडून शहरातील परिस्थिती पवार यांनी जाणून घेतली. महापालिका प्रशासन व पदाधिकारी यांनी राबविलेल्या यंत्रणेबद्दल त्यांनी प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर योगेश बहल, डॉ. वैशाली घोडेकर, राजू मिसाळ आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग आलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजपर्यंत 22 हजार रुग्ण संख्या झाली आहे. जवळपास नऊशे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या बारा हजार सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत सुमारे चाळीस हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र, वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी अण्णासाहेब मगर स्टेडियम आणि ऑटोक्लस्टर एक्झिबेशन सेंटर येथे जम्बो फॅसिलिटी रुग्णालये उभारली आहेत. दोन दिवसांपासून मगर स्टेडियम येथे रुग्ण दाखल करण्यात येत आहेत. ऑटोक्लस्टर येथील रुग्णालय अद्याप सुरू झालेले नाही. 

पिंपरी-चिंचवडकरांनो! महापालिका आयुक्तांनी लागू केली नवीन नियमावली

दोन्ही जम्बो फॅसिलिटी रुग्णालये व महापालिकेने मुख्य प्रशासकीय इमारतीत उभारलेल्या वॉर रूमची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आले आहेत. वॉर रूमची पाहणी करून ते मगर स्टेडियम येथील रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी महापालिका भवनातून रवाना झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp sharad pawar visits jumbo hospital in pimpri chinchwad