esakal | पिंपरीत आज ६१ केंद्रांवर कोविशिल्ड; चार केंद्रांवर कोव्हॅक्सिन
sakal

बोलून बातमी शोधा

Covishield and Covaxin

पिंपरीत आज ६१ केंद्रांवर कोविशिल्ड; चार केंद्रांवर कोव्हॅक्सिन

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पिंपरी - महापालिकेतर्फे मंगळवारी (ता. ६) ६१ केंद्रांवर कोविशिल्ड (Covishield) आणि चार केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस (Covaxin Vaccine) दिली जाणार आहे. वयोगटानुसार व डोसच्या संख्येनुसार लसीकरणाची व्यवस्था केली आहे. सकाळी १० ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ असून ‘कोविन ॲप’वर नोंदणी आवश्‍यक आहे, असे महापालिकेने कळविले आहे. (61 Center Covishield and 4 Centers Covaxin Vaccination in Pimpri Chinchwad)

कोविशिल्ड लसीचा फक्त पहिला डोस घेणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी ३८ केंद्रांवर सोय केली आहे. ४५ पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसह आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाइन वर्कर यांना पहिला व दुसरा डोस घेण्याची व्यवस्था २३ केंद्रांवर आहे. मात्र, दुसरा डोस घेणाऱ्यांनी पहिला डोस घेऊन ८४ ते ११२ दिवस झालेले असावेत. त्यांना सकाळी आठनंतर टोकन दिले जाईल. कोव्हॅक्सिन लशीचा पहिला व दुसरा डोस घेणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी महात्मा फुले शाळा भोसरी व कुटे मेमोरियल हॉल आकुर्डी या केंद्रांवर सोय केली आहे. एका केंद्रावर केवळ शंभर डोस उपलब्ध होतील.

हेही वाचा: दिसेल त्या वाहनावर कोयते मारून माजवली दहशत

मात्र, ४५ पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना पिंपळे गुरव शाळा व फुलेनगरमधील जिजामाता पार्क येथील स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल केंद्रांवर कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. एका केंद्रावर केवळ २०० डोस उपलब्ध असतील. पहिला डोस घेऊन २८ दिवस झाल्यानंतरच दुसरा डोस दिला जाणार आहे.

loading image