पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ६६ जणांना डिस्चार्ज, तर आतापर्यंत एवढे रुग्ण झाले बरे

टीम ई सकाळ
रविवार, 28 जून 2020

  • आज दिवसभरात 66 जणांना डिस्चार्ज
  • 53 नवीन रुग्ण
  • एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 2734 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजार 734 झाली आहे. त्यात शनिवारी मध्यरात्री बारापासून रविवारी सायंकाळी पावणेसात वाजेपर्यंत तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या 49 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत एक हजार 690 जण बरे होऊन घरी गेले आहेत. आज 66 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या एक हजार जणांवर उपचार सुरू असून, आजपर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

आज पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण केशवनगर कासारवाडी, पिंपळे सौदागर, विकासनगर किवळे, गवळीनगर भोसरी, गणेशनगर डांगे चौक, आदर्शनगर पिंपरी, वैदू वस्ती पिंपळे गुरव, आकुर्डी, नेहरूनगर पिंपरी, लांडेवाडी भोसरी, विठ्ठलनगर पिंपरी, दळवीनगर, महात्मा फुलेनगर भोसरी, काशीद पार्क पिंपळे गुरव, डिलक्‍स चौक, शगून चौक पिंपरी, संत तुकारामनगर भोसरी, रिव्हर रोड पिंपरी, कुदळे चाळ पिंपरी, बौद्धविहार पिंपरी, मिलिंदनगर पिंपरी, कैलासनगर थेरगाव, महाराष्ट्र कॉलनी पिंपळे गुरव, मंगलनगर वाकड, भाटनगर, सुभाषनगर पिंपरी, गुलाबनगर दापोडी, वालकंद सोसायटी पिंपळे निलख, तानाजी नगर चिंचवड, विजय अपार्टमेंट पिंपरी, गणेशनगर भोसरी, पाटीलनगर चिखली, दिघी रोड भोसरी, वैभवनगर पिंपरी, तापकीरनगर काळेवाडी, रंजक कॉलनी, इंद्रायणीनगर भोसरी, गणेशनगर दिघी, रूपीनगर निगडी, बापूजीबुवा मंदिर परिसर पिंपळे गुरव, इंदिरानगर चिंचवड स्टेशन, आदर्शनगर काळेवाडी, भारत माता नगर दिघी, संभाजीनगर, यमुनानगर निगडी, जय गणेश साम्राज्य भोसरी, सुदर्शननगर चिखली, भारत माता सोसायटी वाल्हेकरवाडी, चिखलीगाव, शाहूनगर, पटेल गार्डन जुनी सांगवी, किर्ती हॉस्पिटल परिसर पिंपरी, बौद्धनगर पिंपरी, कोकणेनगर काळेवाडी, वाकड, शिवाजी वाडी मोशी, रमाबाईनगर पिंपरी, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर, शास्त्रीनगर पिंपरी, दापोडी, वसंत दादा पाटील स्कूल परिसर नेहरूनगर, नढेनगर काळेवाडी, नंदनवन कॉलनी भोसरी, नम्रता कॉलनी थेरगाव, जवळकर चाळ कासारवाडी, हिराबाई लांडगे झोपडपट्टी कासारवाडी, चिकन चौक निगडी, आनंद विहार रावेत, पुण्यातील हडपसर, मंगळवारपेठे, कोंढवा व चाकण, जून्नर येथील रहिवासी आहेत. 

हेही वाचा- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आर्किटेक्ट विद्यार्थ्यांचा 'हा 'पॅटर्न ठरणार महत्त्वाचा

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज जुनी सांगवी, संजय गांधीनगर, रिव्हर रोड पिंपरी, गोविंद गार्डन, जय हिंद स्कूल परिसर पिंपरी, चिंचवड स्टेशन, यमुनानगर निगडी, नढेनगर काळेवाडी, गवळीनगर भोसरी, आनंदनगर चिंचवड, संत तुकारामनगर पिंपरी, नानेकर चाळ पिंपरी, जगताप डेअरी, विशालनगर पिंपळे निलख, पंचतारानगर आकुर्डी, भगवतगीता मंदिर परिसर खराळवाडी, एक्‍साईड बॅटरी कंपनी परिसर चिंचवड, सिद्धार्थनगर दापोडी, साईबाबानगर चिंचवड, अजंठानगर आकुर्डी, वैष्णव देवी मंदिर परिसर पिंपरी, खंडोबा माळ भोसरी, वैदू वस्ती पिंपळे गुरव, संत तुकारामनगर भोसरी, शाहूनगर चिंचवड, प्रियदर्शनीनगर सांगवी, नढेनगर काळेवाडी, तापकीरनगर काळेवाडी, निगडी, बौद्धनगर पिंपरी, सायली कॉम्पलेक्‍स वाल्हेकरवाडी, वडमुखवाडी, कुदळवाडी चिखली, नेवाळे वस्ती, मोरया नगर चिंचवडगाव, रुपीनगर तळवडे, महात्मा फुलेनगर दापोडी, तापकीरनगर मोशी, महात्मा फुले सोसायटी निगडी, साईबाबानगर चिंचवड, विद्यानिकेतन स्कूल परिसर निगडी, बौद्धनगर पिंपरी, समर्थनगर नवी सांगवी, सोनिगरा अपार्टमेंट चिंचवड, सिंधूनगर निगडी, खराळवाडी, किवळे, पिंपळे गुरव, स्नेहा कॉलनी म्हाडा मोरवाडी, काळेवाडी, भारतनगर पिंपरी, दत्त मंदिर रोड वाकड, कन्हैया पार्क थेरगाव, निगडी प्राधिकरण, लोंढे चाळ पिंपरीगाव, चिखली, विठ्ठलनगर नेहरूनगर, गणेशनगर पिंपरी, हाऊस गल्ली भोसरी, कासारवाडी, सिद्धार्थनगर दापोडी, वसंत नगर काळेवाडी, गांधीनगर येरवडा, आदर्शनगर देहूरोड येथील रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज विशालनगर पिंपरी येथील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. आजपर्यंत एकूण 44 जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, पावसाळा सुरू असल्याने नागरिकांनी अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी, सोबत किमान एक तरी अतिरिक्त मास्क ठेवावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 66 corona patients discharged in pimpri-chinchwad