पिंपरी-चिंचवडकरांनो, स्मार्ट सिटीसाठी 'एवढ्या' कोटींना मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

  • अर्थसंकल्पासह विविध विकास कामांना मंजुरी
  • संचालकपदावर नवीन व्यक्तींची नियुक्ती 

पिंपरी : इलेक्‍ट्रिक सायकली व स्कूटर शेअरिंग प्रकल्पासाठी पाच कोटी रुपयांसह पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या (पीसीएससीएल) 788 कोटी 53 लाखांच्या अर्थसंकल्पास गुरुवारी (ता. 13) मंजुरी देण्यात आली. स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळे गुरव येथील रस्त्यांची उभारणी, पिंपळे सौदागर येथील लिनियल गार्डनचा विस्तार करणे, महापालिकेच्या 117 शाळांमध्ये ई-क्‍लास रूम प्रकल्प राबविणे अशा महत्त्वाच्या प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीसीएससीएलच्या संचालक मंडळाची बैठक ऑटो क्‍लस्टर येथील कार्यालयात झाली. संचालक तथा महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते नाना काटे, पीएमपीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर, मुख्य वित्तीय अधिकारी जितेंद्र कोळंबे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, राजन पाटील, जनरल मॅनेजर इन्फ्रास्ट्रक्‍चर अशोक भालकर आदी उपस्थित होते. पीसीएससीएलचे अध्यक्ष नितीन करीर, संचालिका ममता बत्रा, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त यांचे प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले. 

पर्यटकांनो, लोणावळेकरांचं हे ऐका  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्टार्टअप इनक्‍युबेशन सेंटरसाठी 50 लाख, कंपनी सचिव-लेखापाल, कन्सल्टंट चार्टर्ड अकाऊंट यांच्या नेमणूक, स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपळे गुरव येथील रस्ते, पिंपळे सौदागर येथील लिनियल गार्डनचा विस्तार, प्राथमिक आरोग्य केंद्राची सुधारणा करणे, महापालिकेच्या 117 शाळांमध्ये ई-क्‍लास रूम प्रकल्प राबविणे, कामकाज देखरेख व नियंत्रणासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नेमणे, सभागृह व प्रसारण करणे, विकास अहवालास मान्यता देणे, विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करणे, पीपीपी तत्त्वावर सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणे आदी कामांचे सादरीकरण करून त्यास मान्यता देण्यात आली. विशेष उद्देश वहन (एसपीव्ही बिझनेस प्लॅन) बाबत चर्चा होऊन अंतिम आराखडा सादर करण्याची सूचना देण्यात आली. 

या कामांनाही मंजुरी 

स्मार्ट सिटीच्या पॅन सिटी प्रकल्पांतर्गत व्हेरिएबल मेसेज साइनबोर्ड, सिटी मोबाईल ऍप, स्मार्ट किऑस्क व वाय-फायसारख्या डिजिटल सेवा मोफत देण्यासाठी मोनेटायझिंग एजन्सी म्हणून लेम्मा टेक्‍नॉगीस यांची नियुक्ती करणे, सर्व आयटी पायाभूत सुविधांची तपासणी करण्यासाठी त्रयस्थ तपासणी एजन्सी म्हणून पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची नियुक्ती करणे, इ ऍण्ड वाय कंपनीस तांत्रिक सल्लागारपदी मुदतवाढ देण्यात आली. 

नवीन संचालकांची नियुक्ती 

महापालिका स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक हे पीसीएससीएलचे पदसिद्ध संचालक आहेत. या पदांवरील पदाधिकारी व अधिकारी बदललेले असल्यामुळे विद्यमानांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली. यात स्थायीचे अध्यक्ष लोंढे, सभागृह नेते ढाके, विद्यमान विभागीय आयुक्त राव, पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 788.53 crore sanctioned for pimpri chinchwad smart city