पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनामुक्तांची संख्या वाढतेय; दिवसभरात ८१६ जणांना मिळाला डिस्चार्ज!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत एक हजार 314 पथकांद्वारे शहरात घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. शनिवारपर्यंत 20 लाख 65 हजार 381 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 816 रुग्णांना शनिवारी (ता.3) डिस्चार्ज मिळाला. तर 598 जणांचा अवहाल पॉझिटीव्ह आला. एकूण रुग्णसंख्या 79 हजार 936 झाली असून बरे झालेल्यांची संख्या 72 हजार 980 झाली आहे. सध्या सहा हजार 956 सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी शहरातील 11 आणि बाहेरील 11 अशा 22 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 348 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 511 झाली आहे. तर चिंचवडमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी मृत्यू झालेले शहरातील नागरिक चऱ्होली (पुरुष वय 67), चिंचवड (पुरुष वय 43, 67, 51), प्राधिकरण (पुरुष वय 37), थेरगाव (पुरुष वय 54), चिखली (पुरुष वय 67), मोशी (पुरुष वय 58), चिंचवड (स्त्री वय 62, 25), भोसरी (स्त्री वय 45) येथील रहिवासी आहेत. 

खासदार डॉ. कोल्हेंनी दिला कानमंत्र; 'कोरोनामुक्त असल्याच्या भ्रमात राहू नका!'​

तसेच मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक चाकण (स्त्री वय 62), नांदेड (स्त्री वय 87), देहू (पुरुष वय 66 आणि 60), आंबेगाव (पुरुष वय 62), कात्रज (पुरुष वय 61), अलिबाग (पुरुष वय 53), कामशेत पुरुष (वय 75), भिगवण (पुरुष वय 42), तळेगाव दाभाडे (स्त्री वय 62), मगरपट्टा सिटी (स्त्री वय 55) येथील रहिवासी आहेत. 

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत एक हजार 314 पथकांद्वारे शहरात घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. शनिवारपर्यंत 20 लाख 65 हजार 381 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये एक हजार 733 नागरिकांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्यातील 399 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 816 corona patients in Pimpri Chinchwad were discharged from hospitals