esakal | खासदार डॉ. कोल्हेंनी दिला कानमंत्र; 'कोरोनामुक्त असल्याच्या भ्रमात राहू नका!'
sakal

बोलून बातमी शोधा

MP_Amol_Kolhe

कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी अंगावर आजार न काढता लक्षणे दिसताच प्राथमिक अवस्थेत कोरोना चाचणी करून तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.

खासदार डॉ. कोल्हेंनी दिला कानमंत्र; 'कोरोनामुक्त असल्याच्या भ्रमात राहू नका!'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव (पुणे) : रॅपिड अँटिजेन चाचणीची सेन्सिटिव्हीटी सुमारे ३० ते ४० टक्के आहे. यामुळे रॅपिड अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आली असताना जर रुग्णाला कोरोनाची लक्षणे असतील, तर तातडीने उपचार सुरू करावेत. कोरोनाच्या अचूक निदानासाठी दुसऱ्यांदा स्वॅब चाचणी करुन खात्री करावी. रॅपिड अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आली म्हणून आपण कोरोनामुक्त असल्याच्या भ्रमात राहू नये. कोरोनावर मात करण्यासाठी आजार अंगावर न काढता प्राथमिक अवस्थेत उपचार सुरू करणे आवश्यक आहेत, असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

जुन्नर तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग आणि उपचार सुविधा या बाबतचा आढावा घेण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी (ता.३) दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार डॉ. कोल्हे बोलत होते. या वेळी आमदार अतुल बेनके, जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, तहसीलदार हनुमंत कोळेकर आदी उपस्थित होते.

योगी सरकारचा निषेध...निषेध...निषेध; वंचित बहुजन आघाडीची पिंपरीत निदर्शने​

डॉ. कोल्हे म्हणाले, कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी अंगावर आजार न काढता लक्षणे दिसताच प्राथमिक अवस्थेत कोरोना चाचणी करून तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. कोरोनाचे गांभीर्य ओळखून सर्व प्रथम आपण लेण्याद्री येथे कोविड उपचार केंद्र आणि कोरोना निदानासाठी स्वॅब तपासणी सुरू केली. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांची धावपळ सुरू होते. रुग्णांची धावपळ कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लेण्याद्री, ओझर, नारायणगाव, शिरोली या ठिकाणी शासकीय कोविड उपचार केंद्र सुरू केले आहेत.

जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, ओतूर, खामुंडी येथे नऊ खाजगी कोविड उपचार केंद्र सुरू केले आहेत. खाजगी कोविड उपचार केंद्रांना दरपत्रक लावणे बांधनकारक आहे. शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त बिल घेतल्यास कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. रेमीडेसिव्हर इंजेक्शन तालुक्यात उपलब्ध करून दिली आहेत. या इंजेक्शनचा अनावश्यक वापर करणे धोकादायक आहे. या वेळी डॉ. कोल्हे यांनी कोविड उपचार केंद्रात कर्तव्य बजावत असणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी एन-95 मास्कचे बॉक्स तहसीलदार कोळेकर यांच्याकडे दिले.

पिंपरी : दफनभूमीला पडलाय महावितरणच्या हायटेन्शन तारांचा विळखा​

पोस्ट कोविड उपचार केंद्र सुरू करण्याची गरज :

डॉ. कोल्हे म्हणाले, ''उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे हृदय, फुफ्फुस या अवयवावर परिणाम होण्याची शक्यता असते. कोरोनामुक्त झालो म्हणजे आपण पूर्ण बरे झालो असे न समजता हृदय, फुफ्फुस आदी अवयवाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी योग्य व्यायाम, आहार आणि औषधे आदींचे योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. यासाठी ग्रामीण भागातसुद्धा पोस्ट कोविड मॅनेजमेंट ओपीडी सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू करावी.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image