पिंपरी-चिंचवडमध्ये आज 913 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, तर...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जुलै 2020

शहराच्या विविध भागातील 876 आणि शहराबाहेरील 37, असे एकूण 913 जण शुक्रवारी (ता. 31) कोरोनाबाधित आढळले.

पिंपरी-चिंचवड : शहराच्या विविध भागातील 876 आणि शहराबाहेरील 37, असे एकूण 913 जण शुक्रवारी (ता. 31) कोरोनाबाधित आढळले. तर 130 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 12 जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये 11 पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे कोरोनामुळे निधन

मृत्यू झालेल्यांमध्ये पुनावळेतील 45 वर्षीय पुरुष, चिंचवडमधील 38 वर्षीय महिला, पिंपरीतील 77 व 79 वर्षीय पुरुष, भोसरीतील 41 वर्षीय पुरुष, निगडीतील 70 वर्षीय पुरुष, मोशीतील 65 वर्षीय पुरुष, दापोडीतील 69 वर्षीय पुरुष, चाकणमधील 42 व 45 वर्षीय पुरुष, खेडमधील 55 व 60 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.  शहरात आजपर्यंत 21 हजार 193 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

आजचा वैद्यकीय अहवाल

  • दाखल झालेले संशयित रुग्ण - 4383
  • पॉझिटिव्ह रुग्ण - 913
  • निगेटिव्ह रुग्ण - 3464
  • चाचणी अहवाल प्रतीक्षेतील रुग्ण - 1369
  • रुग्णालयात दाखल एकूण संख्या - 3527
  • डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण - 3887
  • आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या -12575
  • दैनंदिन भेट दिलेली घरे - 24078
  • दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या - 79970

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 913 corona positive on friday in pimpri chinchwad