पिंपरी-चिंचवड शहरात 94 नवीन रुग्ण; बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 December 2020

आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 750 झाली आहे. तर, शहराबाहेरील 720 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष पिंपरी (वय 62), भोसरी (वय 72 व 62), तळवडे (वय 74) व महिला दिघी (वय 65) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष तळेगाव दाभाडे (वय 61), चाकण (वय 63), जुन्नर (वय 58) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 94 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 96 हजार 137 झाली आहे. आज 104 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 92 हजार 779 झाली आहे. सध्या एक हजार 608 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील पाच व शहराबाहेरील तीन जणांचा मृत्यू झाला. 

आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 750 झाली आहे. तर, शहराबाहेरील 720 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष पिंपरी (वय 62), भोसरी (वय 72 व 62), तळवडे (वय 74) व महिला दिघी (वय 65) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष तळेगाव दाभाडे (वय 61), चाकण (वय 63), जुन्नर (वय 58) येथील रहिवासी आहेत. 

सध्या महापालिका रुग्णालयांत 766 रुग्ण उपचार घेत आहेत. 842 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 315 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 280 जणांची तपासणी करण्यात आली. आज 711 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 84 हजार 285 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 

आज दोन हजार 20 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एक हजार 735 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आज रुग्णालयातून दोन हजार 27 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एक हजार 421 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. 

आजपर्यंत पाच लाख 42 हजार 618 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील चार लाख 45 हजार 60 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आजपर्यंत पाच लाख 38 हजार 811 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 92 News Corona Patient found in Pimpri-Chinchwad