esakal | पिंपरी-चिंचवड शहरात ९८ लसीकरण केंद्रे बंद

बोलून बातमी शोधा

Vaccination Center
पिंपरी-चिंचवड शहरात ९८ लसीकरण केंद्रे बंद
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोनावर मात करण्यासाठी लस घेणे महत्त्वाचे आहे. पण लसीचा तुटवडा जाणवत असल्याने शहरातील शंभरपैकी केवळ बारा लसीकरण केंद्र सुरू आहेत. परंतु, पुरेशी लस मिळत नसल्याने ९८ केंद्रे बंद करावी लागत आहेत. त्यामुळे लाभार्थींना मनस्ताप झाला. जिथे डोस मिळेल, तिकडे नागरीकांनी धाव घेतली. पुढील महिन्यापासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची तयारी सुरू आहे. पण लस मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारला करावे लागणार आहेत.

मागणीच्या तुलनेत कमी लस

शहरात एकूण शंभरपेक्षा लसीकरण केंद्रामधून सध्या ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाते. परंतु, लसीचा साठा कमी असल्याने केंद्र बंद करावी लागली आहेत. नागरिकांना लस मिळत लस न घेता परत जावे लागते. मागणीच्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने ही मोहीम संथगतीने सुरू आहे.

इतर ठिकाणी गर्दी

मंगळवारी दहा हजार ८७० लाभार्थींनी रांगा लावून लस घेतली. तशीच रांग बुधवारी होती. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे शहरातील ९८ केंद्रे बंद ठेवली. त्यामुळे लाभार्थींना मनस्ताप झाला. दरम्यान, यमुनानगर रुग्णालय, वायसीएम रुग्णालय या केंद्रावर डोस मिळत असल्याने लाभार्थींची संख्या अधिक होती.

लसीकरण कसे करणार?

लस संपल्याने दोन ते तीन दिवस लसीकरण बंद करावे लागत आहे. आताच ही परिस्थिती असताना पुढील महिन्यापासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लस कशी मिळेल, याबाबत मनात शंका आहे. लसीकरणाचे नियोजन करून जादा लसीचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

येथे मिळतेय लस

पिंपळे गुरव येथील पीसीएमसी शाळा, यमुनानगर रुग्णालय, स्केटिंग ग्राउंड यमुनानगर, म्हेत्रेवस्ती दवाखाना, वायसीएम रुग्णालय, वाकड पीसीएमसी शाळा, तालेरा रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी, नवीन आकुर्डी रुग्णालय आणि दिव्यांगासाठी चिंचवड संभाजीनगर येथील रोटरी क्लब सेंटर मधील लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत.

स्केटिंग ग्राउंड यमुनानगर या केंद्रावर गेल्या दोन दिवसापासून लसीकरणासाठी हेलपाटे मारत आहोत. तासनतास बसून होतो, तरीदेखील मिळाली नाही. आज येण्यास सांगितले, तर प्रत्यक्षात केंद्रच बंद होते.

- पद्मनाभन शेट्टी, हॉटेल व्यावसायिक, निगडी

भोसरीतील सावित्रीबाई फुले शाळा केंद्रावर आम्ही पती-पत्नी सकाळी गेलो असता पहिला डोस घेणाऱ्यास मिळणार नाही, असे सांगण्यात आले. तेव्हा आम्ही मासुळकर कॉलनीतील रूग्णालयातून लस घेतली.

- रवी भेंकी, आळंदी

लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने शहरातील केवळ बारा लसीकरण केंद्र आज सुरू आहेत. लस उपलब्ध नसल्याने आज दुपारपर्यंत मर्यादित साठा होता.

-किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, महापालिका