Pimpri ;आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंधूंच्या कार्यालयावर टाकला पेट्रोल बॉम्ब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंधूंच्या कार्यालयावर टाकला पेट्रोल बॉम्ब

पिंपरी : चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू उद्योजक व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या कार्यलयाजवळ अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब टाकला. ही घटना मंगळवारी (ता. २३) दुपारी घडली.

शंकर जगताप यांचे पिंपळे सौदागर येथे कार्यालय आहे. मंगळवारी दुपारी एका दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी पेट्रोल असलेली बाटली कार्यलयच्या दिशेने टाकली. मात्र, ती मध्येच पडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पेट्रोल बॉम्ब टाकणारे नेमके कोण होते, त्यांनी कार्यलायच्या दिशेनेच बाटली टाकली, यामध्ये अन्य कोण सहभागी आहेत. याचा शोध घेतला जात आहे.

loading image
go to top