Aap Party : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व जागा आम आदमी पार्टी लढणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व जागा आम आदमी पार्टी लढणार असल्याची घोषणा आपचे राज्य उपाध्यक्ष व पिंपरी-चिंचवड प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत केली.
Aam Aadmi Party
Aam Aadmi Partysakal
Updated on

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व जागा आम आदमी पार्टी लढणार असल्याची घोषणा आपचे राज्य उपाध्यक्ष व पिंपरी-चिंचवड प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी सोमवारी (ता. ९) पिंपरी येथे पत्रकार परिषदेत केली.

माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभारीपदी नेमणूक करण्यात आल्यानंतर राठोड यांचा पहिला दौरा आज पिंपरी चिंचवडमध्ये झाला. शहरातील कार्यकर्त्यांबरोबर निवडणुकी संदर्भात आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राठोड म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेला भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या जाचातून मुक्त करण्यासाठी आम आदमी पार्टी आगामी निवडणुका लढणार आहे. दिल्ली आणि पंजाब प्रमाणे सामान्य नागरिकांच्या पाठिंब्यावर पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता हस्तगत करू. कारण भल्या भल्या प्रस्थापितांना धूळ चारण्याची किमया ही सर्व सामान्य नागरिकांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर होत असते.

कामगारनगरीमधील हक्कांच्या घराच्या सर्व योजनांमधील घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यास वचनबद्ध आहोत. आत्तापर्यंतच्या सर्व प्रकल्पांचे महालेखापाल (कॅग) मार्फत चौकशी करून भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करण्याचे आश्वासन देत असल्याचेही राठोड यांनी सांगितले.

यावेळी राज्य प्रवक्ते मुकुंद कीर्दत, पिंपरी चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, शहराध्यक्ष अनुप शर्मा, राज चाकणे, मनोहर पाटील, गोविंद माळी आदि उपस्थित होते.

मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या आयाराम गायाराम संस्कृतीला आप थारा देणार नाही. भारतीय संविधानाची अंमलबजावणी हाच आमचा जाहीरनामा असून त्यादृष्टीने कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवून मोफत दर्जेदार शिक्षण, मोफत उत्कृष्ट आरोग्य सुविधा, विद्यार्थी आणि महिला यांनामोफत बस प्रवास हे आपचे ‘विजन डॉक्युमेंट’ असणार आहे.

- हरिभाऊ राठोड, निवडणूक प्रभारी, आप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com