
Kalewadi Traffic
Sakal
काळेवाडी : रहाटणी येथील मुख्य रस्त्यावर आणि पिंपळे सौदागर-रहाटणी मुख्य रस्त्याला जुन्या बेवारस व पडून असणारी वाहने त्रासदायक ठरत आहेत. रात्रीच्या वेळी त्यांचा आडोसा घेऊन अंधाराचा फायदा घेत मद्यपी मद्यपान करत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय या वाहनांमुळे रहदारीस अडथळा, अपघाताचा धोका आणि कचरा साचून आरोग्याच्या दृष्टीने प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.