पिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना; महिलेला चटके देत केला अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

शरीरावर अगरबत्तीचे चटके देत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार किवळे येथे उघडकीस आला.

पिंपरी : शरीरावर अगरबत्तीचे चटके देत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार किवळे येथे उघडकीस आला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजेश ज्ञानेश्‍वर पवार (वय 22, रा. आदर्शनगर रोड, मुकाई चौक, किवळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. दोघे जण भेटले असता आरोपीने तिचे टॉपलेस फोटो तिचे वडील व पतीला पाठविण्याची धमकी दिली. यासह महिलेच्या शरीरावर दोन्ही बाजूस अगरबत्तीचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच, पीडित महिलेच्या हाता-पायावरही जखम केली. त्यानंतर शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याप्रकरणी आरोपी राजेश पवार याच्यावर वाकड पोलिस ठाण्यात बलात्कार, मारहाण, शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abuse of women in kiwale pimpri chinchwad crime news