ट्रेलर-दुचाकीचा अपघात; एक ठार, एक गंभीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

- भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिली

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण महामार्गावर इंदोरीजवळ मंगळवारी (ता.१९) रात्री साडेदहाच्या सुमारास ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेला तरुण जागीच ठार झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सूर्यकांत तुकाराम खुडे (२६,सुदूंबरे, ता.मावळ, पुणे) असे मयताचे नाव असून, त्याच्या पायावरुन ट्रेलरचे चाक गेल्याने कमरेखालील भागाचा चेंदामेंदा झाला. त्याचा मित्र दुचाकीस्वार उमेश दिगंबर बारवकर (२७,सोमवार पेठ,पुणे) हा गंभीर जखमी झाला आहे. इंदोरी (ता.मावळ) बाह्यवळण मार्गावर इंद्रायणी पुलाजवळील स्मशानभुमीलगत हा अपघात झाला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अपघातानंतर चालक ट्रेलर रस्त्यावरच सोडून फरार झाला. याप्रकरणी मयताचे वडिल तुकाराम बाबूराव खुडे (५८,रणजितसिंह दाभाडे नगर,तळेगाव दाभाडे, मावळ, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रेलर क्रमांक एमएच ४६ एच-२६७८ याच्या अज्ञात चालकाविरोधात तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अपघातामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे आणि सहकाऱ्यांनी त्वरीत अपघातस्थळी धाव घेत जखमीस उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून वाहतूक सुरळीत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on Talegaon Chakan Highway One Died One Injured