
दरम्यान, अटक केलेल्या आरोपींपैकी पाच आरोपींना बेड्या ठोकून पोलिसांनी मंगळवारी घटनास्थळी नेले. नेमकी घटना कशी घडली, टोळके कोणत्या दिशेने आले, कुठे-कुठे फिरले, कोणत्या दिशेने निघून गेले आदी माहिती आरोपींकडून घेण्यात आली.
पिंपरी : तरूणावर प्राणघातक हल्ला करीत शंभर जणांच्या टोळक्याने शुक्रवारी (ता.30) पिंपरीतील नेहरूनगर येथे तलवार, कोयते, लाकडी दांडक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड केली. ज्या ठिकाणी या टोळक्याने दहशत माजविली त्या परिसरात पिंपरी पोलिसांनी या टोळक्यातील आरोपींना मंगळवारी (ता.3) पायी फिरवलं. चार दिवसांपूर्वीच परिसरात धूडगूस घालणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचे पाहून स्थानिकांनी सुस्कारा सोडला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आशिष जगधने (वय 31), इरफान शेख (वय 30), जितेश मंजुळे (वय 28), जावेद औटी (वय 29), आकाश हजारे (वय 30) यांच्यासह वीस जणांना अटक केली आहे. तर चौदा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर नीलेश सुभाष जाधव (वय 35, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शंभर जणांवर गुन्हा दाखल आहे.
दारुच्या नशेत झाला किरकोळ वाद; फावड्याच्या दांडक्याने केला डोक्यात वार
दरम्यान, अटक केलेल्या आरोपींपैकी पाच आरोपींना बेड्या ठोकून पोलिसांनी मंगळवारी घटनास्थळी नेले. नेमकी घटना कशी घडली, टोळके कोणत्या दिशेने आले, कुठे-कुठे फिरले, कोणत्या दिशेने निघून गेले आदी माहिती आरोपींकडून घेण्यात आली. तसेच गुन्ह्यातील हत्यारे जप्त करण्यात आली. पोलिसांनी या घटनेत 17 वाहने जप्त केली आहेत.