
वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पोलिसांनी लॉकडाउन नियमांची कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. गेल्या दोन दिवसांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८५ जणांवर कारवाई करण्यात आल्याची लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक नवनीतकुमार कॉवत यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्याच्या शहरी तसेच, ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी लॉकडाउन नियमांची पुन्हा कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा ग्रामीण व लोणावळा शहर या पोलिस ठाण्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात गस्त सुरु करून ठिकठिकाणी नाकाबंदी लावली आहे. वडगाव पोलिसांनी वडगाव-तळेगाव फाटा, फळणे फाटा येथे, कामशेत पोलिसांनी पवनानगर चौक, भाजगाव-उंबरवाडी फाटा, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वरसोली टोलनाका, कार्ला फाटा, मळवली-भाजे रस्ता, दुधीवरे खिंड, लोणावळा शहर पोलिसांनी कुमार चौक, रायवुड पार्क, नौसेना बाग, खालापूर टोलनाका आदी ठिकाणी वाहन चेकिंग पॉईंट नेमले आहेत व लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धडक मोहीम चालू केली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गेल्या दोन दिवसांमध्ये शासनाचे नियम मोडून बिनकामाचे फिरणाऱ्या २८५ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यात विना पास फिरणाऱ्या ९० जणांवर, मास्क न घालता फिरणाऱ्या १३५ जणांवर, चार चाकी वाहनांमध्ये तीनपेक्षा अधिक लोक व मोटारसायकलवर दोनपेक्षा अधिक लोक तसेच, क्वारंटाइन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६० जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती कॉवत यांनी दिली. यापुढील काळातही विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर अशीच कारवाई करण्याच्या सूचना संबंधीत पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे हे फक्त पोलिसांचे कर्तव्य नसून नागरिकांची जबाबदारी आहे. जनतेने स्वतःबरोबरच इतर नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी नियमांचे पालन करावे व पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन कॉवत यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.