हिंजवडी आयटी परिसरात जाणाऱ्यांनो मास्क वापरा, नाहीतर...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जुलै 2020

सध्या हिंजवडी आयटी परिसरातील गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

हिंजवडी : सध्या हिंजवडी आयटी परिसरातील गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हिंजवडी ग्रामपंचायतीने गावातून विना मास्क फिरणाऱ्या पादचारी व वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून दहा हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी टी. व्ही. रायकर यांनी दिली.

महत्त्वाची बातमी : पिंपरी-चिंचवड शहरासाठी असा असेल लॉकडाउन

हिंजवडीतील शिवाजी चौक परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. मास्क न लावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून 500 रुपये दंड आकारला असून, 20 जणांवर ही कारवाई केली. दरम्यान, शुक्रवारी (ता. १०) मुळशी तालुक्यात 17 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये आठ पुरुष व नऊ स्त्रियांचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 187 असून, एका 73 वर्षाच्या पुरुषाचा औंध येथील जिल्हा उपरुग्णालयात मृत्यू झाला. 

पिंपरी-चिंचवडमध्ये मृतांचा आकडा वाढतोय, दिवसभरात आज 'एवढ्या' जणांचा मृत्यू

तालुक्यातील आतापर्यंत एकूण मृत्यू झालेली रुग्ण संख्या तीन असून, अद्यापही दोन जण गंभीर आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांनी दिली. शुक्रवारी मिळालेल्या 17 रुग्णांमध्ये मारुंजी मधील तीन पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action against those do not wear masks in hinjawadi it park