महत्त्वाची बातमी : पिंपरी-चिंचवड शहरासाठी असा असेल लॉकडाउन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 July 2020

  • पहिले पाच दिवस कडक अंमलबजावणी, नंतरचे पाच दिवस थोडे शिथिल
  • महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी मध्यरात्रीपासून 10 दिवसांसाठी लॉकडाउन सुरू होणार आहे. यातील पहिले पाच दिवस कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. उर्वरित पाच दिवस थोडे शिथिल केले जाणार आहेत. तसेच, कोणते कारखाने, कंपन्या बंद ठेवायच्या, कोणत्या सुरू ठेवायच्या या बाबत उद्यापर्यंत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अधिकाधिक रुग्ण लवकरात लवकर शोधून उपचार करण्यावर भर दिला आहे. शहरासह पुणे शहर व जिल्ह्यात ही स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी आज दोन्ही शहरांसह जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यानंतर लॉकडाउन करण्याचे आदेश त्यांनी दिला. 

पुण्याच्या लॉकडाउनबाबत सरकारने घेतलाय महत्त्वाचा निर्णय...​

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ''कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांचा कडक लॉकडाउन करण्यात येणार आहे. सोमवार (ता. 13) मध्यरात्रीपासून ते 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन असेल. त्यातील पहिले पाच दिवस कडक अंमलबजावणी केली जाईल. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन थोडी शिथिलता आणली जाईल.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Commissioner Shravan Hardikar informed that ten days lockdown in pimpri chinchwad